• Download App
    PM मोदींच्या मध्यस्थीमुळे टळले रशिया-युक्रेनमधील अणुयुद्ध; अमेरिकन अधिकारी म्हणाले- मोदींच्या फोनकॉलमुळे पुतिन यांचे बदलले मन|Russia-Ukraine nuclear war averted due to PM Modi's mediation; American officials said - Modi's phone call changed Putin's mind

    PM मोदींच्या मध्यस्थीमुळे टळले रशिया-युक्रेनमधील अणुयुद्ध; अमेरिकन अधिकारी म्हणाले- मोदींच्या फोनकॉलमुळे पुतिन यांचे बदलले मन

    वृत्तसंस्था

    वॉशिंग्टन : 2022 मध्ये रशिया आणि युक्रेनमध्ये अणुयुद्ध होणार होते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर अण्वस्त्र हल्ला करण्याची योजना आखली होती. नंतर पंतप्रधान मोदींमुळे हे अणुयुद्ध थांबले.Russia-Ukraine nuclear war averted due to PM Modi’s mediation; American officials said – Modi’s phone call changed Putin’s mind

    हा दावा दोन अमेरिकन अधिकाऱ्यांनी केला आहे. सीएनएनने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, त्यावेळी पुतिन यांच्या या भूमिकेमुळे अमेरिकन प्रशासन खूपच नाराज झाले होते. त्यानंतर बायडेन यांनी भारतासह अनेक देशांकडून सहकार्य मागितले.



    वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही त्यावेळी केलेल्या कामांपैकी एक म्हणजे रशियाला थेट संदेश पाठवणे एवढेच नाही तर ज्या देशांचे शब्द पुतीनपर्यंत पोहोचू शकतात त्यांची मदतही मागितली. मग बाहेरून येणारा दबाव चांगलाच उपयोगी पडला.

    अमेरिकन अधिकारी म्हणतात की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतरांच्या सार्वजनिक वक्तव्यांमुळे हे संकट टाळण्यास मदत झाली.

    खेरसनमधील तणावामुळे 2022 मध्ये अणुहल्ला झाला असता

    2022 च्या उत्तरार्धात रशियाच्या अण्वस्त्र हल्ल्याची माहिती मिळाली होती, असे अहवालात म्हटले आहे. जेव्हा युक्रेनियन सैन्य दक्षिणेकडील रशियन-व्याप्त खेरसनमध्ये वेगाने पुढे जात होते. त्यांनी रशियन सैन्याला पूर्णपणे घेरले होते.

    ही अशी परिस्थिती होती जी रशियन सरकारला त्रास देत होती. खेरसनमधील सद्य:स्थिती हे अणुहल्ल्याचे प्रमुख कारण बनू शकते अशी चर्चा अमेरिकन प्रशासनात होती. यानंतर अमेरिकेने भारतासह ग्लोबल साउथच्या इतर देशांकडे मदत मागितली. भारत, चीन आणि इतर देशांनी रशियाशी संपर्क साधून दबाव आणल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

    मोदी पुतीन यांना म्हणाले- हे युद्धाचे युग नाही

    रशिया-युक्रेन युद्धात नागरिकांच्या हत्येचा भारताने नेहमीच निषेध केला आहे आणि संघर्ष शांततेने संपवण्याचे आवाहन केले आहे. पीएम मोदींनी गेल्या वर्षी उझबेकिस्तानमध्ये झालेल्या SCO शिखर परिषदेच्या निमित्ताने अध्यक्ष पुतिन यांना सांगितले होते की, हे युद्धाचे युग नाही. भारताच्या अध्यक्षतेखाली जी-20 प्रसिद्धीपत्रकातही हे विधान करण्यात आले.

    Russia-Ukraine nuclear war averted due to PM Modi’s mediation; American officials said – Modi’s phone call changed Putin’s mind

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या