वृत्तसंस्था
मॉस्को : Russia Knife Attack रशियाच्या बश्कोर्तोस्तान रिपब्लिकमधील उफा शहरातील स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीच्या वसतिगृहात शनिवारी अनेक विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला झाला. या हल्ल्यात चार भारतीय विद्यार्थ्यांसह किमान सहा जण जखमी झाले. भारतीय दूतावासाने याला एक दुर्दैवी घटना म्हटले आहे.Russia Knife Attack
प्राथमिक माहितीनुसार, एक 15 वर्षांचा मुलगा हातात चाकू घेऊन परदेशी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील प्ले हॉलमध्ये घुसला आणि तेथे अनेक विद्यार्थ्यांवर हल्ला केला. अटकेदरम्यान आरोपीने पोलिसांवरही हल्ला केला, ज्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले.Russia Knife Attack
गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्या मेजर जनरल इरिना वोल्क यांच्या मते, आरोपीने स्वतःलाही दुखापत केली आहे. भारतीय दूतावासाने सांगितले की ते स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहेत. कझान येथील भारतीय वाणिज्य दूतावासाचे अधिकारी जखमी विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी उफा येथे रवाना झाले आहेत.
रशियन फेडरल आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे, तर तिघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. हल्लेखोराला गंभीर अवस्थेत स्थानिक बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उफा प्रशासनाने या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
टेलिग्राम चॅनल बाजा नुसार, आरोपी एका प्रतिबंधित निओ-नाझी संघटनेशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. दावा करण्यात आला आहे की, हल्ल्यादरम्यान तो राष्ट्रवादी घोषणा देत होता. तथापि, या दाव्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. प्रत्यक्षदर्शींच्या मते, वसतिगृहाच्या आत जमिनीवर सर्वत्र रक्त पसरले होते.
Russia Knife Attack: 4 Indian Students Injured at Ufa Medical University
महत्वाच्या बातम्या
- Malegaon : मालेगावमध्ये इस्लाम पक्षाच्या नसरीन महापौर झाल्या, सपा उपमहापौरपदी
- Tragedy in Kota : कोटामध्ये 3 मजली इमारत कोसळली, अनेक जण दबले; रेस्टॉरंटमध्ये ग्राहक आणि कर्मचारी होते
- उद्योगांना त्रास देणाऱ्या घटकांना ठोकून काढू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
- शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर अवलंबून राहू नका!!, पण हे सांगायला काँग्रेस हायकमांड पाहिजेच कशाला??