• Download App
    रशियाने स्पेस रॉकेटवरून अमेरिका, जपान, ब्रिटनसह अनेक देशांचे ध्वज हटविले, भारतीय तिरंगा मात्र कायम|Russia removes flags of many countries including US, Japan, Britain from space rocket, but Indian tricolor remains

    रशियाने स्पेस रॉकेटवरून अमेरिका, जपान, ब्रिटनसह अनेक देशांचे ध्वज हटविले, भारतीय तिरंगा मात्र कायम

    विशेष प्रतिनिधी

    मॉस्को : रशियाने आता आपल्या स्पेस रॉकेटवरून अमेरिका, जपान आणि ब्रिटनचा ध्वज हटवला आहे. विशेष म्हणजे रशियाने भारतीय ध्वज तिरंगा कायम ठेवला आहे. रशियन स्पेस एजन्सी रोस्कोस्मोसचे प्रमुख दिमित्री रोगोजिन यांनी सोशल मीडियावर रशियन स्पेस रॉकेटचा व्हिडिओ शेअर केला आहे.Russia removes flags of many countries including US, Japan, Britain from space rocket, but Indian tricolor remains

    व्हिडिओमध्ये दिसते की, रशियन स्पेस रॉकेटमधून अनेक देशांचे ध्वज हटवले जात आहेत, तर रॉकेटवर भारताचा ध्वज कायम असल्याचे दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिले की, ‘बैकोनूरमधील आमच्या टीमने ठरवले की आमचे रॉकेट काही देशांच्या ध्वजशिवाय चांगले दिसेल.’ कजाकिस्तानमधील बायकोनूर येथे रशियाने रॉकेट लॉन्च पॅड तयार केले आहे.



    वनवेब इंटरनेट कंपनीला शुक्रवारी रशियन सोयुझ रॉकेटवर 36 सेटेलाइट लॉन्च करायचे होते, परंतु रोस्कोस्मोसने नकार दिला. यासाठी रोस्कोस्मोसने मंगळवारी एक निवेदन जारी केले की ते वनवेब कंपनीसाठी रशियन सोयुझ रॉकेट लॉन्च करणार नाही. दिमित्री रोगोजिन यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ हा या सॅटेलाइट ला लॉन्च करणाºया रॉकेटचा व्हिडिओ आहे.

    Russia removes flags of many countries including US, Japan, Britain from space rocket, but Indian tricolor remains

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या

    Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प इटलीच्या PM मेलोनींना भेटले; युरोपियन युनियनशी व्यापार कराराचे आश्वासन