• Download App
    Russia may attack on Ukraine tomarrow ; FB Post of Ukren president

    यूक्रेनवर रशिया उद्या हल्ला करणार; युक्रेनच्या राष्ट्रपतींच्या फेसबुक पोस्टमुळे युद्धाचे ढग

    वृत्तसंस्था

    किवी : यूक्रेनवर रशिया उद्या हल्ला करणार आहे, या युक्रेनच्या राष्ट्रपतींच्या फेसबुक पोस्टमुळे युद्धाची शक्यता बळावली आहे. Russia may attack on Ukraine tomarrow ; FB Post of Ukren president

    रशिया युक्रेनवर हल्ला करणार आहे का? या युक्रेनच्या राष्ट्रापतीच्या फेसबुक पोस्टनंतर जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सोमवारी जाहीर केले की बुधवार, १६ फेब्रुवारी हा “एकतेचा दिवस” ​​असेल कारण त्या दिवशी त्यांच्या देशावर रशियन आक्रमण सुरू होऊ शकते.

    फेसबुकवर पोस्ट केलेल्या त्यांनी राष्ट्राला संबोधित केलेल्या भाषणात म्हंटले की, कीव आणि मॉस्को यांच्यातील तणाव वाढला आहे. याआधी शुक्रवारी अमेरिकेचे राष्ट्रपती बिडेन प्रशासनाने युक्रेनवर कधीही हल्ला होऊ शकतो, असा इशारा दिला होता. दरम्यान, रशियन सैनिकांचे पब्जी स्टाईलमध्ये सराव करतानाचे फोटो-व्हिडिओही प्रसिद्ध झाले आहेत.

    झेलेन्स्कीने फेसबुकवर लिहिले की, एकता दिवस घोषित करणाऱ्या फर्मानावर आधीच स्वाक्षरी झाली आहे. आम्हाला सांगण्यात आले आहे की १६ फेब्रुवारी हा हल्ल्याचा दिवस असेल.

    Russia may attack on Ukraine tomarrow ; FB Post of Ukren president

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या