विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : युक्रेनबरोबर सुरू असलेल्या युद्धादरम्यान यूएनजीएने रशियाचा निषेध करणारा ठराव मंजूर केला आहे. रशियाच्या विरोधात 141 मते पडली तर समर्थनार्थ फक्त 5 मते पडली. त्याच वेळी, 35 देशांनी यात भाग घेतला नाही.Russia fell alone in the world, with 141 countries voting against in the UNGM
रशियाने युक्रेनवर चढवलेल्या हल्ल्यात अनेक शहरं बेचिराख झाली आहे. अनेकांनी आपला जीव गमावला आहे. रशियाकडून अणू हल्याच्या धमक्या येत आहे. त्यामुळे जगभरातून रशियावर टीका होत आहे. अनेक देशांनी रशियावर विविध निर्बंध लावले आहेत. कित्येक देशांनी त्यांच्या हवाई हद्दीत रशियाला बंदी घातली आहेत. तर रशियानेही अनेक देशावर रशियाच्या हवाई हद्दीत बंदी घातली आहे.
अमेरिकेकडूनही रशियाच्या कोंडीचा प्रयत्न होताना दिसत आहे. अनेक प्रकारचे निर्बंध अमेरिकेने रशियावर लावले आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये झालेली चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरली आहे. आजही रशिया आणि युक्रेनमध्ये चर्चा होणार होती. मात्र ही चर्चा उद्यावर ढकलली आहे.
त्यामुळे उद्याच्या चर्चेकडून जगाचे लक्ष लागले आहे. चर्चेतून मार्ग काढावा आणि रशियाने युद्ध थांबवावे असे आवाहन जगभरातील देशांकडून करण्यात येत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली. मोदींनी युक्रेनमधील परिस्थितीचा आढावा घेतला,
विशेषत: खार्किवमध्ये जेथे अनेक भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्या भागातून भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याबाबत चर्चा केली. त्यामुळे भारतीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हजारो भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना यूक्रेनमधून सुखरुपपणे मायदेशी परत आणण्याचं आव्हान भारत सरकारपुढे आहे.
Russia fell alone in the world, with 141 countries voting against in the UNGM
महत्त्वाच्या बातम्या
- विलीनीकरणाची मागणी व्यावहारिक नसल्याचा निष्कर्ष ; एसटी प्रश्नाबाबत त्रिसदस्यीय समितीचा अहवाल
- पुणे,मुंबईसह 14 जिल्ह्यात निर्बंध शिथिल ; रेस्टॉरंट आणि सिनेमागृहांना सवलत
- RUSSIA- UKRAIN-INDIA : भारतात परतले विद्यार्थी – मायदेशात झाले मायबोलीत स्वागत !जेव्हा स्मृती ईराणी म्हणाल्या महाराष्ट्रातील कोण कोण आलंय ?…
- स्वाभिमानीचे ४ मार्चला महाराष्ट्रभर चक्काजाम; शेतकऱ्यांना दिवसा विजपुरवठ्याची मागणी