• Download App
    रशियाला आला तालीबानचा पुळका, तालिबानच्या नियंत्रणात काबुलची स्थिती चांगली असल्याचे दिले सर्टिफिकेट Russia certifies Kabul under Taliban in more controled

    रशियाला आला तालीबानचा पुळका, तालिबानच्या नियंत्रणात काबुलची स्थिती चांगली असल्याचे दिले सर्टिफिकेट

    विशेष प्रतिनिधी

    मॉस्को : तालीबानबरोबर चांगले संबंध निर्माण ठेवण्यासाठी आता रशियाने त्यांची तळी उचलणे सुरू केले आहे. तालीबानचा पुळका आलेल्या रशियाने म्हटले आहे की, अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्या सरकारच्या तुलनेत आता तालिबानच्या नियंत्रणात असलेल्या काबुलची स्थिती चांगली आहे. Russia certifies Kabul under Taliban in more controled

    तालीबानला संपूर्ण जगात अतिरेकी संघटना म्हणून ओळखले जाते. मात्र, तालिबानसोबत संबंध प्रस्थापित करण्याचे संकेत रशियाने या माध्यमातून दिले आहेत. अमेरिकेचा पाठिंबा असलेले अशरफ घनी सरकार अचानक कोसळल्यानंतर तालिबानने रविवारी काबुलचा ताबा घेतला. त्यानंतर घनी यांनी देश सोडला होता. अमेरिकी सैन्याने माघार घेण्याची घोषणा केल्यापासून तालिबान काबुलचे नियंत्रण घेईल याचे संकेत प्राप्त झाले होते.



    घनी यांच्या सरकारच्या तुलनेत तालिबानी नेतृत्वात काबुलची स्थिती चांगली आहे, असे वृत्त रशियातील अफगाणिस्तानचे राजदूत दिमित्री झिरनोव्ह यांच्या हवाल्याने मॉस्कोतील इखो मॉस्कव्ही या रेडिओ स्टेशनने सोमवारी दिले.
    काबुलमध्ये प्रवेश केला, त्यावेळी तालिबानी नि:शस्त्र होते. काबुलमध्ये प्रवेश करताच त्यांनी विदेशातील दूतावासांना संरक्षणाची हमी दिली, असे झिरनोव्ह यांनी सांगितले.

    तालिबान्यांनी काबुलमध्ये प्रवेश केल्यावर सोमवारी स्थानिकांना हॉटलाईन्स उपलब्ध करून दिल्या. कुणीही लुटालूट केल्यास, तत्काळ तालिबानसोबत संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितल्याचा जावा झिरनोव्ह यांनी केला.

    Russia certifies Kabul under Taliban in more controled

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Saudi Arabia : सौदी अरेबियातील रस्ते अपघातात 45 भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस आणि डिझेल टँकरची धडक

    Sheikh Hasina, : शेख हसीना यांना फाशीची शिक्षा; बांगलादेश कोर्टाने विद्यार्थ्यांच्या हत्येचे दोषी मानले; युनूस म्हणाले- भारताने शेख हसीना यांना सोपवावे

    Tariff India : अमेरिकेत महागाई वाढताच ट्रम्प यांना उपरती, भारतातील चहा-कॉफी आणि मसाल्यांवरील 50% टॅरिफ हटवला