वृत्तसंस्था
न्यूयॉर्क – वंशद्वेषी प्रचार रोखण्यात अपयश आल्याचा आरोप करत निर्वासित रोहिंग्या मुस्लिमांनी ‘फेसबुक’विरोधात १५० अब्ज डॉलरचा अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. म्यानमारमधील लष्करी नेत्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी रोहिंग्या मुस्लिमांविरोधात फेसबुकच्या माध्यमातून चिथावणी दिल्याने मोठा हिंसाचार झाल्याचा या निर्वासितांचा आरोप आहे.Rohingya filed suit against Facebook
निर्वासित रोहिंग्या मुस्लिमांतर्फे काही वकीलांनी कॅलिफोर्निया येथे ‘फेसबुक’ची पालक कंपनी असलेल्या ‘मेटा प्लॅटफॉर्म्स’विरोधात खटला दाखल केला आहे. फेसबुकमुळेच म्यानमारमध्ये रोहिंग्यांविरोधात मोठा अपप्रचार झाला.
लष्करी नेत्यांनी केलेली चिथावणीखोर विधाने फेसबुकमार्फतच सर्वांपर्यंत वेगाने पोहोचल्याने हिंसाचाराला खतपाणी मिळाले आणि रोहिंग्या मुस्लिमांचा वंशच्छेद करण्याचा प्रयत्न झाला, असा दावा वकीलांनी केला आहे. ब्रिटनमधील वकीलांनीही फेसबुकविरोधात अशाच प्रकारचा खटला दाखल करणार असल्याचे जाहीर केले आहे.
म्यानमारमध्ये रोहिंग्यांविरोधात मोठ्या प्रमाणात हिंसाचार कसा झाला, याचे गेली काही वर्षे विश्लेिषण करण्याचे काम सुरु होते. म्यानमारमध्ये वंशद्वेषाला चिथावणी देणारे संदेश आणि व्हिडिओ रोखून धरण्यात अपयश आल्याचे फेसबुकच्या अंतर्गत अहवालातून उघड झाले होते.
Rohingya filed suit against Facebook
महत्त्वाच्या बातम्या
- आक्रमकांचा तमोमय इतिहास पुसून पुन्हा सोन्याने झळाळली बाबा विश्वनाथ यांची काशीनगरी!!
- 13 डिसेंबर 2021 : काशी विश्वनाथ कॉरिडाॅर उद्घाटन; राष्ट्रविकासाचे संपूर्ण महिनाभर महामंथन!!
- एस एस राजामौली यांच्या RRR सिनेमाचा ट्रेलर झाला प्रदर्शित
- पुणे – मुंबईत दिवसभरात ओमायक्रॉनचे ७ नवे रुग्ण; मुंबईत ३, पिंपरी-चिंचवडमध्ये ४ रुग्ण