रॉक नावाने ओळखला फास्ट अॅँड फ्युरिअसमधील स्टार आणि डिन जॉन्सनने अमेरिकेतील राजकारण्याच्या छातीत धडकी भरविली आहे. अमेरिकन नागरिकांचा पुरेसा पाठिंबा असेल तर आपण अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यास तयार आहोत असे त्याने म्हटले आहे.Rock said if there is enough support from Americans, they will contest the presidential election
विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : रॉक नावाने ओळखला फास्ट अॅँड फ्युरिअसमधील स्टार आणि डिन जॉन्सनने अमेरिकेतील राजकारण्याच्या छातीत धडकी भरविली आहे. अमेरिकन नागरिकांचा पुरेसा पाठिंबा असेल तर आपण अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यास तयार आहोत असे त्याने म्हटले आहे.
४८ वर्षीय डीन जॉन्सन हा अमेरिकेतील सर्वाधिक लोकप्रिय आणि महागडा स्टार आहे. अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरण्याचे त्याचे अनेक वर्षांपासून स्वप्न आहे. जॉन्सन म्हणाला, अमेरिकेला पुन्हा एकत्र आणण्याचे माझे लक्ष्य आहे.
अमेरिकेतील जनतेलाही तेच वाटत असेल तर मी नक्कीच त्यासाठी प्रयत्न करायला तयार आहे. अमेरिकेतील लोकप्रिय अशा टूडे या टीव्ही शो वर दिलेल्या मुलाखतीत जॉन्सनने आपली अध्यक्षपदाची महत्वाकांक्षा जाहीर केली.
एकेकाळचा व्यावसायिक कुस्तीपटू असलेल्या जॉन्सनने याने कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढविण्यास आवडेल हे सांगण्यास नकार दिला. त्याचबरोबर सक्रीय राजकारणात कधी उतरणार हे सांगण्याचेही त्याने टाळले.
जॉन्सनच्या मुलाखीनंतर पिपलसे या सर्व्हेक्षण कंपनीने एक आॅनलाईन सर्व्हे केला. यामध्ये ४६ टक्के अमेरिकन नागरिकांनी आपण जॉन्सनला मत देऊ असे सांगितले.