• Download App
    दक्षिण आफ्रिकेत लुटालूट आणि चेंगराचेंगरी, मृतांची संख्या शंभरावर |Riots erupts in south Affrica

    दक्षिण आफ्रिकेत लुटालूट आणि चेंगराचेंगरी, मृतांची संख्या शंभरावर

    विशेष प्रतिनिधी

    जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष जेकब झुमा यांना गेल्या आठवड्यात झालेल्या अटकेनंतर दोन प्रांतांमध्ये अनेक ठिकाणी उफाळलेला हिंसाचार अद्यापही शमण्याची चिन्हे नाहीत. अनेक ठिकाणी लुटालूटीचे प्रकार सुरु असून चेंगराचेगरीत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या शंभरच्या वर गेली आहे.Riots erupts in south Affrica

    न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी झुमा यांना १५ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली असून गेल्या आठवड्यात ते पोलिसांना शरण आले आहेत. या अटकेनंतर दक्षिण आफ्रिकेतील गुतेंग आणि क्वाझुलु-नाताल या दोन प्रांतांमध्ये अराजकता वाढली आहे. हजारो लोक मॉल आणि दुकानांमध्ये लुटालूट करत आहेत.



    अन्न, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मद्य आणि कपडे यांची मोठ्या प्रमाणवर लूट केली जात आहे. त्यांना अटकाव करण्यासाठी पोलिस आणि सैनिकांना रबरी गोळ्या आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागत आहे. अशा वेळी मोठा गोंधळ उडून चेंगराचेंगरी होत असून त्यात अनेकांचा मृत्यू होत आहे.

    वाढत्या अशांततेमुळे या दोन राज्यांमधील अनेक लसीकरण केंद्रेही बंद करावी लागली असून पोलिसांनी आतापर्यंत बाराशे जणांना अटक केली आहे. अनेक नागरिकांनी एटीएम यंत्रे फोडण्याचाही प्रयत्न केला. ही यंत्रे फोडण्यासाठी स्फोटकांचा केलेला वापर काही जणांच्या जीवावर बेतला. पोलिसांच्या गोळीबारातही काही नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

    Riots erupts in south Affrica

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gaza Food Center : गाझात फूड सेंटरमध्ये चेंगराचेंगरी, 43 ठार; जमावाने 15 जणांना चिरडले; इस्रायली सैन्यावर नरसंहाराचा आरोप

    Trump White House : ट्रम्प व्हाइट हाऊसमध्ये असताना सुरक्षेत त्रुटी, लॉकडाऊन लागू; अज्ञाताने सुरक्षा कुंपणावरून फोन फेकला

    Ukraine : अमेरिकीशी मिनरल डील करणाऱ्या युलिया युक्रेनच्या पीएम होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा पाठिंबा