• Download App
    ऑफिसमध्ये मास्क काढून जोरात खोकला ; स्पेनमध्ये तब्बल 22 जण झाले कोरोनाग्रस्त Removing the mask in the office and coughing loudly; In Spain, 22 people were infected with coronavirus

    ऑफिसमध्ये मास्क काढून जोरात खोकला ; स्पेनमध्ये तब्बल 22 जण झाले कोरोनाग्रस्त

    वृत्तसंस्था

    माद्रीद : भारतासह जगभरात कोरोनाची दुसरी लाट पसरली आहे. स्पेनमध्येही या लाटेने हाहाकार माजवला आहे. दरम्यान, स्पेनमध्ये 22 जणांना कोरोना संक्रमित केल्याबद्दल एकाला पोलिसांनी अटक केली. Removing the mask in the office and coughing loudly; In Spain, 22 people were infected with coronavirus

    याबाबतची हकीकत अशी की, ही घटना स्पेन देशातील मलोर्का शहरातील आहे. या प्रकरणी शनिवारी 40 वर्षीय व्यक्तीला अटक केली. हा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह होता. जाणूनबुजून या व्यक्तीने 22 लोकांना कोरोना संक्रमित केल्यानंतर त्याला अटक झाली आहे.



    कोरोनाचे लक्षण असल्याने त्याने चाचणी केली. त्यात तो पॉझिटिव्ह आढळला होता. तरीही तो सामान्य व्यक्ती म्हणून वागत होता. त्याच्या ऑफिसच्या सहकाऱ्यांनी सांगितले की, ताप असतानाही तो ऑफिसला येत होता.

    पोलिसांनी सांगितले की, तो एकेदिवशी कार्यालयात जोरात खोकला आणि चेहऱ्यावरील मास्क हटवून मी सगळ्यांना म्हणाला की, तुम्हाला कोरोना संक्रमित करणार आहे. त्यामुले कार्यालयात धावपळ उडाली. कर्मचाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर त्याने पळ काढला. पोलिसांनी त्याला अखेर अटक केली.

    या आरोपीने 8 लोकांना कोरोना संक्रमित केले असून 14 जणांना अप्रत्यक्षणपणे कोरोना झाला आहे. ज्या लोकांना कोरोना झालाय ते त्याच्या कार्यालयात काम करतात तर काही जीममध्ये वर्क आऊट करतात.

    ज्या लोकांना कोरोना झालाय त्यात 3 मुलांचाही समावेश आहे. ज्यांचे वय 1 वर्षही आहे. सध्या आरोपीच्या संपर्कात आलेले जे पॉझिटिव्ह आढळले ते आयसोलेटमध्ये आहेत. याशिवाय अनेकांनी स्वत:ची चाचणी करून घेतली आहे.

    Removing the mask in the office and coughing loudly; In Spain, 22 people were infected with coronavirus

     

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Trump : ग्रीनलँडवर हल्ल्यासाठी ट्रम्प यांची तयारी सुरू असल्याचा अहवाल, विशेष कमांडोंना जबाबदारी; जनरल म्हणाले- राष्ट्रपतींचा हट्ट 5 वर्षांच्या मुलासारखा

    Haka Protest : न्यूझीलंडमध्ये दुसऱ्यांदा नगर कीर्तनाला विरोध; कीवी ग्रुपने हाका डान्स केला; म्हणाले- या आमच्या गल्ल्या, तलवारी फिरवण्याची परवानगी कोणी दिली

    Iran Protests : इराण हिंसाचार- 538 जणांचा मृत्यू, 10 हजार जणांना अटक; इराणने अमेरिका आणि इस्रायलला दिली धमकी