विशेष प्रतिनिधी
दिल्ली : अनिल अंबानी यांच्या रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेड (RNESL) या कंपनीने आज 31 डिसेंबर रोजी घोषणा केली आहे की, त्यांनी फॅराडिओन लिमिटेड ही कंपनी विकत घेतली आहे. फॅराडिओन ही एक सोडियम-आयन सेल निर्माण करणारी कंपनी आहे.
Reliance Company buys Faradion Limited Company! Will there be a big change in battery technology now?
फॅराडियनच्या सोडियम-आयन सेलच्या सध्या अस्तित्वात असणाऱ्या तंत्रज्ञानाच्या व्यावसायिक गतीला वाढ आणि गती देण्यासाठी रिलायन्स मार्फत भांडवल म्हणून $134.9 दशलक्ष गुंतवणूक केली जाईल.
लिथियम, कोबाल्ट आणि निकेलच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहेच. ह्याचे साठे देखील मर्यादित आहेत. ह्या पार्श्वभूमीवर पर्याय म्हणून सोडियम-आयन बॅटरीचा वापर करणे ही काळाची गरज आहे.
सोडियम-आयन बॅटरीचे पेटंट ही फॅराडिओन कंपनीच्या नावावर होते. आता ते तंत्रज्ञान रिलायन्स मार्फत वापरले जाईल. ह्यामुळे भारतीय बाजारात बॅटरीची किंमत कमी
होते का हे पाहणे महत्वाचे आहे.
Reliance Company buys Faradion Limited Company! Will there be a big change in battery technology now?
महत्त्वाच्या बातम्या
- GST Council Meeting : नववर्षापूर्वी सर्वसामान्यांना मोठा दिलासा, कपड्यांवर जीएसटीचे दर तूर्तास वाढणार नाहीत
- 2021ची वर्षाअखेर गाजतेय जुमला अवॉर्ड सेरिमनीने!!; And the Award goes to जुमला फकीर…!!
- मोठी बातमी : रशियाचा स्पाय सॅटेलाइट अवकाशात झाला अनियंत्रित, लवकरच पृथ्वीवर आदळण्याची शक्यता, शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा
- Income Tax Return : ITRची मुदत वाढवण्यास अर्थमंत्रालयाचा नकार, कोणत्याही परिस्थितीत 12 वाजेपर्यंत दाखल करा!