• Download App
    रशिया व युक्रेनच्या फौजा आमनेसामने, युद्धाच्या भितीने समस्त युरोपला ग्रासले|Raussia – Ukrane ready foe battel

    रशिया व युक्रेनच्या फौजा आमनेसामने, युद्धाच्या भितीने समस्त युरोपला ग्रासले

    विशेष प्रतिनिधी

    मॉस्को – रशिया व युक्रेनमधील तणाव निवळण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. गेल्या आठवड्यात युक्रेनच्या सीमेवर रशियन फौजा तैनात झाल्याने दोन्ही देशांत तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देशांमध्ये युद्ध होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.Raussia – Ukrane ready foe battel

    युक्रेनने त्यांचे निम्मे सैन्य म्हणजे सुमारे सव्वा लाख सैनिक रशिया पुरस्कृत फुटीरतावादी भागात तैनात केल्याचा दावा रशियाने केला आहे.रशिया व युक्रेनमधील वाढता तणाव हा शीतयुद्धानंतर युरोपमधील सुरक्षेबाबत मोठे संकट ठरु शकतो, असे मानले जात आहे.



    रशिया व युक्रेन यांचे सांस्कृतिक, आर्थिक आणि राजनैतिक क्षेत्रांत घनिष्ठ संबंध आहेत. किव्ह या युक्रेनची राजधानी रशियातील शहरांची जननी म्हणले जाते. सांस्कृतिक क्षेत्रात रशियाची राजधानी मॉस्को किंवा सेंट पीटर्सबर्ग हे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व किव्हला आहे.

    व्यापार क्षेत्रातही रशियासाठी युक्रेनचे मोठे महत्त्व आहे. सोव्हिएत महासंघाच्या विघटनानंतर युक्रेन स्वतंत्र होणे ही इतिहासातील मोठी चूक असल्याचे काही रशियन नेते मानतात. युक्रेनवरील ताबा जाणे आणि पश्चि मी देशांत युक्रेनचा दबदबा वाढणे

    ही बाब आंतरराष्ट्रीय पातळीवर रशियासाठी मानहानिकारक असल्याचे समजले जाते. युक्रेन हा युरोपमधील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. अत्यंत सुपीक जमीन हे या देशाचे बलस्थान आहे. युक्रेनच्या पूर्वेकडील भागात अनेक मोठे उद्योग आहेत.

    युक्रेन ‘नाटो’चा सदस्य देश नसला तरी या संघटनेशी त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत. रशियाबरोबर संबंध बिघडत असताना युक्रेनला उत्तर अटलांटिक करार संघटनेचा (नाटो) पाठिंबा मिळत आहे. पण युक्रेनच्या ‘नाटो’च्या सदस्यत्वाला रशियाचा तीव्र विरोध आहे. युक्रेन जर ‘नाटो’त सहभागी झाला तर ही संघटना रशियावरही दबाव टाकण्याचा प्रयत्न करेल, असा दावा रशिया करीत आहे.

    Raussia – Ukrane ready foe battel

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या