विशेष प्रतिनिधी
हवाना : क्युबातील कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि क्युबाचे महान नेते फिडेल कॅस्ट्रो यांचे धाकटे बंधू राऊल कॅस्ट्रो (वय ८९) यांनी आज पक्षाच्या प्रथम सचिवपदाचा राजीनामा दिला.Raul castro resigns from his post
यामुळे क्युबाला सहा दशकांनंतर प्रथमच ‘कॅस्ट्रो’विनाच देशाचा कारभार चालणार आहे.राऊल कॅस्ट्रो यांच्या राजीनाम्यामुळे क्युबामधील राजकारणातील ‘कॅस्ट्रो युग’ समाप्त झाले आहे.
१९५९ मध्ये देशात क्रांती करून सत्तेवर आलेल्या फिडेल कॅस्ट्रो यांनी या युगाला सुरुवात केली होती. तेव्हापासून राऊल हे भावाबरोबरच होते. २०१६ मध्ये फिडेल यांचे निधन झाल्यावर त्यांनी पक्षाची सूत्रे स्वीकारली होती.
राऊल यांनी पक्षाच्या बैठकीत राजीनामा देत असल्याची घोषणा केली. त्यांच्यानंतर कोण, याबाबत अद्याप निर्णय झाला नसला तरी पक्षाचे अध्यक्ष मिग्वेल डॅझकॅनेल यांच्याकडेच सूत्रे जाण्याची शक्यता आहे. २०१८ ला राऊल यांनीच त्यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली होती.