विशेष प्रतिनिधी
लंडन : ब्रिटनच्या शाही कुटुंबाला आता राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या ९५ व्या वाढदिवसाचे वेध लागले आहेत. येत्या काही महिन्यांत त्यांना राणीपदावर विराजमान होण्यास सात दशकं पूर्ण होत असून त्यानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या उत्सवाकडे देशाचे लक्ष लागले आहे.Queen Elizabeth will ready for celebrated 95 th birthday
९५ वा वाढदिवस साजरा करणाऱ्या राणी एलिझाबेथ द्वितीय या आणखी किती काळ पदावर राहतील याबाबत अटकळ बांधली जात आहे. भविष्यात राजघराणे कसे असेल आणि ते कसे अस्तित्वात असेल याबाबतही तर्कवितर्क लावले जात आहे.
राणी एलिझाबेथ आता कारकिर्दीच्या नव्या टप्प्यावर आहेत. त्या आता विधवा आहेत आणि आता या पदाचा कसा सांभाळ करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. ब्रिटनच्या राजकीय निरीक्षकांच्या मते, सार्वजनिक बांधिलकी पाहता राणी इतक्यात पदाचा त्याग करतील,
असे वाटत नाही. दुसरीकडे मोठा मुलगा ७२ वर्षीय प्रिन्स चार्ल्स यांच्यावर अधिकाधिक जबाबदारी सोपविण्यास सुरवात केली आहे. प्रिन्स फिलिप यांच्या मृत्यूनंतर या प्रक्रियेला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.
ब्रिटिश साम्राज्याशी निगडित असलेल्या ५४ देशाच्या राष्ट्रकुलच्या प्रमुखांनी राणीचे उत्तराधिकारी म्हणून चार्ल्स यांचे नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
Queen Elizabeth will ready for celebrated 95 th birthday