वृत्तसंस्था
वॉशिंग्टन – युक्रेनच्या सीमेवर रशियाने सैन्य केल्यानंतर निर्माण झालेला तणाव कमी करण्याच्या हेतूने आज रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन आणि अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यात चर्चा झाली. मात्र, व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून दोन तास झालेल्या चर्चेनंतरही तोडगा निघाला नसल्याचे ‘व्हाइट हाऊस’तर्फे सांगण्यात आले.Putin – Biden discussion failed
जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिका व शीतयुद्धातील शत्रू असलेल्या रशियातील या चर्चेकडे साऱ्या जगाचे लक्ष लागलेले होत. युक्रेनच्या सीमेवर युद्ध भडकण्याचा धोका आहे. त्यामुळे यावर तत्काळ तोडगा काढण्याची गरज व्यक्त होत आहे.
या चर्चेदरम्यान बायडेन यांनी पुतीन यांना,‘ युक्रेनवर आक्रमण केल्यास तुमच्या अर्थव्यवस्थेला हानिकारक ठरतील असे निर्बंध लावू,’ असा स्पष्ट इशारा दिला. मात्र, आमचे सैन्य आमच्या हद्दीतच असून इतर कोणालाही त्रास द्यायची आमची इच्छा नाही, असे पुतीन यांनी स्पष्ट केले. दोघेही आपापल्या भूमिकांवर ठाम राहिल्याने कोणताही तोडगा निघाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
Putin – Biden discussion failed
महत्त्वाच्या बातम्या
- आक्रमकांचा तमोमय इतिहास पुसून पुन्हा सोन्याने झळाळली बाबा विश्वनाथ यांची काशीनगरी!!
- 13 डिसेंबर 2021 : काशी विश्वनाथ कॉरिडाॅर उद्घाटन; राष्ट्रविकासाचे संपूर्ण महिनाभर महामंथन!!
- एस एस राजामौली यांच्या RRR सिनेमाचा ट्रेलर झाला प्रदर्शित
- पुणे – मुंबईत दिवसभरात ओमायक्रॉनचे ७ नवे रुग्ण; मुंबईत ३, पिंपरी-चिंचवडमध्ये ४ रुग्ण