वृत्तसंस्था
नवी दिल्ली : ‘इलेक्ट्रिक कारचे उत्पादन चीनमध्ये करायचे आणि विक्री भारतात करायची, हे पचनी पडणारे नाही’, अशा शब्दात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी टेस्लाचे सर्वेसर्वा आणि उद्योगपती अॅलन मस्क त्यांना सुनावले आहे. Production in China, sales in India will not work; Gadkari told Tesla’s Elon Musk.
अॅलन मस्क यांना त्यांच्या इलेक्ट्रिक कारची विक्री भारतात करण्यासाठी करकपात करावी, असे वाटते. त्याबाबत त्यांनी विनंती केली होती. त्यावर गडकरी यांनी चोख उत्तर दिले आहे. सरकार सोबत आव्हानामुळे टेस्ला अद्याप भारतात नाही, असे ट्विट मस्क यांनी केले होते. त्या ट्विटचा समाचार गडकरी यांनी घेतला आहे.
‘इलेक्ट्रिक कारचे उत्पादन चीनमध्ये करायचे आणि विक्री भारतात करायची, हे पचनी पडणारे नाही. त्या पेक्षा मस्क त्यांनी येथूनच सुरुवात केली तर बरे पडेल’, असे गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान टेस्लाच्या भारतीय शाखेच्या प्रमुखाला भेटून भारताची भूमिका स्पष्ट केल्याचे गडकरी म्हणाले.
Production in China, sales in India will not work; Gadkari told Tesla’s Elon Musk.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यपालांच्या हस्ते उद्योजकांना ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार प्रदान
- Share Market : सेन्सेक्स १४०० अंकांनी कोसळून ५७ हजारांच्या खाली, निफ्टी १७ हजारांच्या खाली घसरला
- महाराष्ट्र काँग्रेस उत्तर भारतीय सेलच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ
- गोव्यात मतदान सुरू : मुख्यमंत्री सावंत यांचा दावा – भाजप पुन्हा करणार सरकार स्थापन; उत्पल पर्रीकरांना विजयाचा आत्मविश्वास