आइंडहोव्हन मराठी मित्र मंडळ व रमणबाग युवा मंच जर्मनी यांच्या सयुंक्त उपक्रमातून ही मिरवणूक उत्साहात पार पडली.
विशेष प्रतिनिधी
आईंधोवन : नेदरलॅंड या देशामधील आईंधोवन या शहरामध्ये प्रथमच गणपती बाप्पाची ढोल, ताशा व लेझीमच्या गजरात जंगी वाजतगाजत भव्यदिव्य मिरवणूक संपन्न झाली. आइंडहोव्हन मराठी मित्र मंडळ व रमणबाग युवा मंच जर्मनी यांच्या सयुंक्त उपक्रमातून ही सुंदर मिरवणूक पार पडली. Procession of Lord Ganesha to the beat of drums in Eindhoven Netherlands
मिरवणुकीदरम्यान भारतीय संस्कृतीमधील विविधता, नृत्य, खाद्य व पेहराव अशा माध्यमामधून दाखविण्यात आली. यावेळी भारतीय समुदायासह इतर देशीय नागरिक सुद्धा सहभागी झाले आणि या सुंदर क्षणांचे साक्षीदार झाले. अगदी लोकमान्यांना अभिप्रेत असावा असा एक सर्वसमावेशक उत्सव पार पडला.
आइंडहोव्हन मराठी मित्र मंडळ इतर भारतीय समुदाय व मंडळांच्या सहकार्याने विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपली संस्कृती जतन करून ती भावी पिढीपर्यंत पोहचविण्याचे कार्य वर्षानुवर्षे करत आहे. यंदाचा गणेशोत्सव हा त्याचेच एक प्रतिबिंब होता असे म्हणायला हरकत नाही.
Procession of Lord Ganesha to the beat of drums in Eindhoven Netherlands
महत्वाच्या बातम्या
- PM मोदी आज 9 वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार, या हायटेक ट्रेन 11 राज्यांमधून जाणार
- निक्की हेली म्हणाल्या- चीन युद्धाच्या तयारीत, अमेरिका आणि जगासाठी धोका, त्यांचे सैन्य अनेक बाबतींत पुढे
- गुगलला आव्हान देणार फोन पे; लाँच करणार स्वत:चे ॲप स्टोअर; अँड्रॉइड ॲप डेव्हलपर्सना निमंत्रण
- सर्वात मोठी कसिनो चेन असलेल्या डेल्टा कॉर्पला तब्बल 11,139 कोटींची GST नोटीस, कंपनीने कर न भरल्याचा आरोप