विशेष प्रतिनिधी
काबुल : अफगाणिस्तानमध्ये तालीबानी दहशतवादी आता बदला घेऊ लागले आहेत. अमेरिकेची राजवट असताना महिला न्यायाधीशांनी शिक्षा सुनावलेले कैदी आता सत्तापालट झाल्यानंतर सुटले आहेत.Prisoners began to take revenge, convicted Taliban terrorists trying to take the lives of female judges
हे कैदी आता बदल्याच्या भावनेने पछाडले असून आपल्याला तुरुंगात पाठवणाऱ्या महिला न्यायाधीशांचा ते शोध घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे महिला न्यायाधीश सध्या चिंतेत आहेत.
महिलांनी न्यायदानाचे काम करणे, ही संकल्पनाच तालिबानला मान्य नाही. त्यामुळे न्यायालयात काम करणाऱ्या सर्व महिलांना तालिबानचा विरोध आहे. त्यात ज्या तालिबानी आरोपींना महिला न्यायाधीशांनी शिक्षा सुनावली होती, त्यांना आता तालिबानची सत्ता आल्यानंतर तुरुंगातून सोडून देण्यात आलं आहे.
हे कैदी आता बदल्याच्या भावनेने पछाडले असून महिला न्यायाधीशांचा शोध घेत आहे. ही बाब अगोदरच लक्षात आल्यामुळे काही महिला न्यायाधीशांनी देश सोडला आहे. मात्र बहुतांश न्यायाधीश अद्यापही अफगाणिस्तानमध्ये अडकून पडल्या असून सुटकेचा कुठलाही मार्ग त्यांना दिसत नाही.
आपला शोध घेत तुरुंगातून सुटलेले काही कैदी आपल्या परिसरात येऊन आपल्याविषयी चौकशी करत होते, अशी माहिती एका महिला न्यायाधीशाने वृत्तसंस्थेला दिली आहे. अनेक महिला न्यायाधीश या सध्या आपली ओळख लपवून किंवा ओळख बदलून जगत आहेत. अनेकांनी आपल्या मूळ पत्त्यावरून स्थलांतर केले असून तालिबानी कैद्यांपासून स्वत:चा बचाव करण्याचा त्या प्रयत्न करत आहेत.
Prisoners began to take revenge, convicted Taliban terrorists trying to take the lives of female judges
महत्त्वाच्या बातम्या
- अत्याधुनिक जागतिक शहरे न्यूजर्सी, न्यूयॉर्क पाण्याखाली, मुसळधार पावसाने अमेरिका हादरली
- पंजप्यारेंचा अपमान करणाऱ्या हरिश रावत यांनी घेतले प्रायाश्चित, गुरुद्वारा झाडला, बुटही साफ केले
- तालिबानबरोबर रहायचे की जगाबरोबर हा निर्णय चीनचा – अमेरिकेने पुन्हा दिला इशारा
- काश्मीरी मुस्लिमांसाठी आवाज उठवण्याची तालिबानच्या प्रवक्त्याची वल्गना