- राणी एलिझाबेथ (दुसऱ्या) यांचे पती प्रिन्स फिलीप यांचं वयाच्या 99व्या वर्षी निधन झालं आहे.
- बकिंगहॅम पॅलेसने ही घोषणा केली.राणी एलिझाबेथ (दुसऱ्या) आणि प्रिन्स फिलीप यांचं लग्न 1947 मध्ये झालं. त्यांना चार मुलं, आठ नातू आणि दहा पणतू आहेत.
- नोव्हेंबर मध्ये त्यांनी आपली 73 वी मॅरेज अॅनिवर्सरी साजरी केली होती.येत्या जून मध्ये प्रिन्स फिलीप वयाचे 100 वर्ष पूर्ण करणार होते.
विशेष प्रतिनिधी
लंडन : क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांचे पती प्रिन्स फिलीप यांचे वयाच्या 99 व्या वर्षी निधन झाले आहे. बकिंगहॅम पॅलेसने याबाबतची घोषणा केली. प्रिन्स फिलिप यांनी 1947 मध्ये राजकुमारी एलिझाबेथ यांच्याशी लग्न केले होते.
ब्रिटीश राजघराण्यातील हे सर्वात प्रदीर्घ काळ सेवा देणारं जोडपं ठरलं. Prince Philip, Husband Of Queen Elizabeth II, Dies At 99
प्रिन्स फिलीप यांच्या निधनाबाबत बॅकिंगहम पॅलेसने याबाबत पत्रक जारी केलं आहे.
‘ राणी एलिझाबेथ यांनी अत्यंत दुख:द घोषणा केली आहे. प्रिय पती प्रिन्स फिलीप यांचं निधन झालं आहे. आज सकाळीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला’
बकिंगहॅम पॅलेसकडून आलेल्या पत्रकात म्हटलं आहे, “अतीव दुःखाने हर मॅजेस्टी राणी एलिझाबेथ त्यांचे प्रिय पती हिज रॉयल हायनेस द प्रिन्स फिलीप, ड्यूक ऑफ इडनबर्ग यांच्या निधनाची बातमी जाहीर करत आहेत.””हिज रॉयल हायनेस आज सकाळी विंडसर कॅसलमध्ये शांतपणे निवर्तले.”
राणी एलिझाबेथ (द्वितीय) म्हणजे तत्कालीन राजकुमारी आणि प्रिन्स फिलीप यांचा 1947 मध्ये विवाह झाला होता. ब्रिटीश राजघराण्यात 70 वर्षं ड्युकपदावर राहिलेले फिलीप हे एकमेव व्यक्तिमत्त्व होते.
सुरुवातीला ते ब्रिटीश रॉयल नेव्हीत कार्यरत होते. एका सम्राज्ञीबरोबर 70 वर्षांहून अधिक संसार केला आणि त्यासाठीच त्यांना ओळखलं जातं.
प्रिन्स फिलीप प्रथमपासून रूढीवादाला फाटा देणारे म्हणून ओळखले गेले. राजघराण्यात असूनदेखील काही प्रथांना त्यांनी उघड विरोध केला होता आणि ब्रिटीश राजवाड्यात आधुनिकता आणली होती. आता पुढचा महिनाभर ब्रिटीश राजघराण्यात दुखवटा पाळला जाईल.
त्यानंतरच महाराणी एलिझाबेथ रॉयल ड्युटी सांभाळायला पुन्हा सज्ज होतील.
Prince Philip, Husband Of Queen Elizabeth II, Dies At 99