वृत्तसंस्था
न्युयोर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या 76 व्या अधिवेशनामध्ये संबोधित करत आहेत. पंतप्रधानांचे त्यांच्या हॉटेलबाहेर अनेक भारतीयांनी काल जल्लोषात स्वागत केले होते. ‘वंदे मातरम्’ आणि ‘भारत माता की जय’ ह्या घोषणा दिल्या.
पंतप्रधान मोदी आज बऱ्याच मुद्यांवर बोलले आहेत. त्यापैकी काही मुद्दे खालील प्रमाणे :
- कोविडमुळे जीव गमावलेल्यां नागरिकांना पंतप्रधान मोदींनी श्रद्धांजली वाहिली. “गेल्या दीड वर्षापासून, जग 100 वर्षांपेक्षा जास्त काळातील सर्वात मोठूं आणि वाईट साथीला सामोरे गेले आहे. कोविडमुळे जीव गमावलेल्या सर्वांना मी आदरांजली देतो,” असे यूएनजीए सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
- पंतप्रधान मोदी भारतातील स्वच्छ पाण्याच्या मुद्द्यावर देखील बोलले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “भारताने स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणी देण्यासाठी प्रवास सुरू केला आहे.”
- UNGA सत्रात नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणले, “मी एका राष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो ज्याला लोकशाहीची आई म्हटले जाते. या वर्षी भारताने स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण केली. भारताच्या लोकशाहीची ताकद या वस्तुस्थितीमध्ये आहे की एक चहा विक्रेता चौथ्यांदा संयुक्त राष्ट्रांना संबोधित करत आहे. होय, आणि ही ताकद लोकशाहीने दिली आहे. भारत आज सर्वसमावेशक एकात्मिक विकासाकडे पाहत आहे, “असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूएनजीए सत्रात सांगितले.
- पंतप्रधान मोदी भारताने मिळवलेल्या यशाबद्दल बोलताना म्हणाले “गेल्या सात वर्षात 43 कोटी लोकांना बँक खाती मिळाली आहेत. 36 कोटी लोकांचा विमा काढण्यात आला आहे. आम्ही 3 कोटीहून अधिक घरे बनवली आहेत. बेघर लोकांना घर मिळाले आहे. आम्ही 17 कोटी घरांना पाईपयुक्त पाणी पुरवण्याचा विचार करत आहोत. जमिनीचे मॅपिंग करण्यापासून ते क्रेडिट देण्यापर्यंत, आम्ही लोकांना घरे घेण्याची संधी देत आहोत.
Prime Minister Narendra Modi is addressing the 76th session of the United Nations General Assembly in New York
महत्त्वाच्या बातम्या
- पुन्हा ईडीचे समन्स, पुन्हा चौकशी! परिवहनमंत्री अनिल परब यांनी चौकशीसाठी हजर राहावे, सोमय्यांनी केले ट्विट
- 76th UNGA: थोड्याच वेळात पंतप्रधान मोदींचे संयुक्त राष्ट्राच्या महासभेला संबोधन, दहशतवादासह या महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलण्याची शक्यत
- PPF मध्ये फक्त १००० रुपये गुंतवून तुम्ही १२ लाखांपेक्षा जास्त कमावू शकता, पैसे गमावण्याचा नाही धोका
- बहुजनांच्या पोरांनी फक्त सतरंज्या उचलाव्यात, हीच यांची मानसिकता ; पडळकरांची ठाकरे – पवार सरकारवर टीका