१४ वर्षांनंतर फ्रान्सच्या या परेडमध्ये भारतीय पंतप्रधानांचा सहभाग
विशेष प्रतिनिधी
पॅरीस : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर गेले आहेत. फ्रान्सच्या नॅशनल डे परेडमध्ये सहभागी होण्यासाठी ते फ्रान्सला गेले आहेत. तब्बल 14 वर्षांनंतर फ्रान्सच्या या परेडमध्ये भारतीय पंतप्रधान सहभागी झाले आहेत. फ्रान्समध्ये ‘बॅस्टिल डे परेड’ सोहळ्याला मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. Prime Minister Modi participates in Frances Bastille Day Parade
फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बॉर्न आणि फर्स्ट लेडी ब्रिजिट मॅक्रो यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. यानंतर राष्ट्राध्यक्ष मॅक्रो यांनी मोदींना अलिंगन देत स्वागत केले. या बॅस्टिल डे परेडमध्ये भारतीय सशस्त्र दलाच्या 269 सदस्यांचा तुकडाही सहभागी झाल्या आहेत. याशिवाय भारतीय वायुसेनेच्या 3 राफेल लढाऊ विमानांनीही फ्रेंच लढाऊ विमानांसह चॅम्प्स एलिसेसच्या फ्लायपास्टमध्ये सहभाग घेतला आहे.
या परेडमध्ये भारतीय लष्कराच्या पंजाब रेजिमेंटची 77 मार्चिंग तुकडीही सहभागी झाली आहे. यासोबतच बँड पथकाच्या 38 सैनिकांचाही या परेडमध्ये समावेश करण्यात आला आहे. भारतीय लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व कॅप्टन अमन जगताप करत आहेत. त्याचबरोबर कमांडर व्रतबघेल हे भारतीय नौदल संघाचे नेतृत्व करत आहेत. तर फ्रान्समध्ये होत असलेल्या या परेडमध्ये स्क्वॉड्रन लीडर सिंधू रेड्डी भारतीय हवाई दलाच्या तुकडीचे नेतृत्व करत आहेत. यावेळी भारतीय तुकडीमध्ये उपस्थित असलेल्या राजपुताना रायफल्सने राष्ट्रगीताची धूनही वाजवली.
या परेडमध्ये फ्रान्स सामान्यत: एकापेक्षा जास्त परदेशी पाहुण्यांना समारंभासाठी आमंत्रित करत असतो, परंतु यावेळी फ्रान्सच्या या सोहळ्यातील एकमेव प्रमुख पाहुणे पंतप्रधान मोदी आहेत. यापूर्वी 2009 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
Prime Minister Modi participates in Frances Bastille Day Parade
महत्वाच्या बातम्या
- पवारनिष्ठ लिबरल मांडतात फडणवीसांच्या “राजकीय बळीची” कविकल्पना, पण ही खरी भाजप बळकटीकरण, एनडीए विस्ताराची मोदींची योजना!!
- पंतप्रधान मोदींना आणखी एक सर्वोच्च नागरी पुरस्कार; फ्रान्सचा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘लिजन ऑफ ऑनर’ मिळवणारे ठरले पहिले भारतीय!
- भारतीयांसाठी अभिमानास्पद दिन! इस्रो आज श्रीहरिकोटा येथून ‘चंद्रयान-३’ प्रक्षेपित करणार!
- जम्मू-काश्मीर : शोपियानमध्ये दहशतवादी हल्ला, तीन जण ठार, राज्यात अलर्ट जारी!