• Download App
    BRICS Summit : ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी जोहान्सबर्गला पोहोचले, विमानतळावर जोरदार स्वागत! Prime Minister Modi arrived in Johannesburg to participate in the BRICS Summit received a warm welcome at the airport

    BRICS Summit : ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी जोहान्सबर्गला पोहोचले, विमानतळावर जोरदार स्वागत!

    2019 नंतर ब्रिक्स नेत्यांची ही पहिली शिखर परिषद आहे.

    विशेष प्रतिनिधी

    जोहान्सबर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 व्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी मंगळवारी (22 ऑगस्ट) संध्याकाळी 5.15 वाजता दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे पोहोचले. यावेळी विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी येथे आले असून ते 22 ते 24 ऑगस्टपर्यंत मुक्काम करणार आहेत. Prime Minister Modi arrived in Johannesburg to participate in the BRICS Summit, received a warm welcome at the airport

    पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी भारतीय समुदायातील लोक मोठ्या संख्येने विमानतळावर उपस्थित होते. यावेळी मोदींनी लोकांना अभिवादन केले आणि हस्तांदोलनही केले.दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी, पंतप्रधान मोदींनी विश्वास व्यक्त केला  होता की शिखर परिषद सदस्य देशांना भविष्यातील सहकार्याची क्षेत्रे ओळखण्यासाठी आणि संस्थात्मक घडामोडींचा आढावा घेण्यासाठी उपयुक्त संधी देईल.

    पीएम मोदींनी अगोदर ट्विटरवर लिहिले की, “मी ‘ब्रिक्स-आफ्रिका आउटरीच’ आणि ‘ब्रिक्स प्लस डायलॉग’ कार्यक्रमांमध्ये देखील सहभागी होणार आहे. ब्रिक्स शिखर परिषद ‘ग्लोबल साऊथ’ आणि विकासाच्या इतर क्षेत्रांच्या गंभीर विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करेल.

    या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या अनेक अतिथी देशांशी संवाद साधण्यास उत्सुक असल्याचे मोदी म्हणाले. ते म्हणाले की, जोहान्सबर्गमध्ये उपस्थित असलेल्या काही नेत्यांसोबत मी द्विपक्षीय बैठक घेण्यास उत्सुक आहे.

    Prime Minister Modi arrived in Johannesburg to participate in the BRICS Summit received a warm welcome at the airport

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या