• Download App
    अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन झाले भावूक; आशियाई वर्णद्वेषविरोधी विधेयकावर स्वाक्षरी|President Joe Biden become emotional

    अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन झाले भावूक; आशियाई वर्णद्वेषविरोधी विधेयकावर स्वाक्षरी

    विशेष प्रतिनिधी

    वॉशिंग्टन : अमेरिकेतील बायडेन सरकारने आज आशियाई वर्णद्वेषविरोधी विधेयकास मान्यता दिली. या ऐतिहासिक विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर ज्यो बायडेन यांनी वर्णद्वेषाविरोधात सर्वच सदस्य एकत्र येणे ही अभिमानाची गोष्ट असल्याचे म्हटले आहे.President Joe Biden become emotional

    आजच्या कार्यक्रमामध्ये बोलताना बायडेन भावुक झाले होते. मला अमेरिकेचा खरोखरच अभिमान वाटतो असे सांगत त्यांनी वर्ण आणि वंशद्वेषाच्या विरोधातील लढ्यातून लोकांनी एकत्र यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.



    या विधेयकाच्या स्वाक्षरी समारंभाला अमेरिकी संसदेतील अनेक सदस्य उपस्थित होते. मागील आठवड्यात प्रतिनिधीगृहामध्ये हे विधयेक ३६४ विरुद्ध ६२ मतांनी मंजूर झाले होते

    तर अमेरिकी सिनेटमध्येही एप्रिल महिन्यात त्यावर ९४ विरुद्ध १ अशा मतांनी मान्यतेची मोहोर उमटविण्यात आली होती.नव्या कायद्यामुळे वर्णद्वेषाच्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यांच्या तपासाला वेग येणार असून न्याय विभागाचे अधिकार देखील त्यामुळे आणखी वाढतील.

    तसेच या बदलामुळे स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या तपास संस्थांच्या चौकशी प्रक्रियेमध्ये वेग येणार आहे. आतापर्यंत या तपासाला फारसे महत्त्व दिले जात नसे.

    President Joe Biden become emotional

    Related posts

    Sheikh Hasina, : शेख हसीना यांना फाशीची शिक्षा; बांगलादेश कोर्टाने विद्यार्थ्यांच्या हत्येचे दोषी मानले; युनूस म्हणाले- भारताने शेख हसीना यांना सोपवावे

    Tariff India : अमेरिकेत महागाई वाढताच ट्रम्प यांना उपरती, भारतातील चहा-कॉफी आणि मसाल्यांवरील 50% टॅरिफ हटवला

    US South Korea : दक्षिण कोरियाला आण्विक पाणबुड्या बांधण्यास अमेरिका मदत करणार; द. कोरियाचे अध्यक्ष म्हणाले- किम जोंगशी सामना करण्यासाठी पाणबुड्यांची आवश्यकता