• Download App
    ते डोक्यात गोळी घालतात, पण क्रांती ह्रदयातून होते....असे काव्य रचणारा कवी म्यानमारमध्ये हुतात्मा|Popular poet died in Myanmar

    ते डोक्यात गोळी घालतात, पण क्रांती ह्रदयातून होते….असे काव्य रचणारा कवी म्यानमारमध्ये हुतात्मा

    विशेष प्रतिनिधी

    यंगून : म्यानमारमधील लोकप्रिय तरूण कवी खेट थी यांचा अटकेदरम्यान मृत्यू झाला आहे. सत्ता ताब्यात घेतलेल्या लष्कराच्या कायदेमंडळावरील टीकेमुळे त्यांचा गळा घोटण्यात आल्याची दाट शक्यता आहे.Popular poet died in Myanmar

    खेट ४५ वर्षांचे होते. त्यांनी लष्करी उठावाला विरोध केला होता. ते डोक्यात गोळी घालतात, पण क्रांती ह्रदयातून होते हे त्यांना माहीत नाही, अशा त्यांच्या ओळी आंदोलकांसाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत.



    सागैंग प्रांतातील श्वेबो गावात शनिवारी खेट यांना पत्नी चॉ सू यांच्यासह चौकशीसाठी सशस्त्र जवान आणि पोलिसांनी ताब्यात घेतले. चॉ सू यांनी बीबीसी बर्मीज वृत्तसंस्थेला मोनीवा येथून सांगितले की, माझी चौकशी झाली.

    खेट यांचीही चौकशी झाली. त्यांना चौकशी ठाण्यावर ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले, पण ते परत आले नाहीत, त्यांचे पार्थिवच आले. लष्कराने खेट यांच्या पार्थिवाचे दफन करण्याची तयारी केली होती. त्यामुळे चॉ सू यांना मनधरणी करावी लागली.

    Popular poet died in Myanmar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    इराणनेच फाडला पाकिस्तानी मध्यस्थीचा बुरखा; इराणी परराष्ट्रमंत्री मदत मागण्यासाठी गेले रशियाला; डोनाल्ड ट्रम्पचा पापड मोडला!!

    Colombia Bus : कोलंबियात बसवर स्फोटक हल्ला:13 जणांचा मृत्यू, 38 जखमी; अंमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित सशस्त्र गटांवर संशय

    FM Araghchi ; इराणचे परराष्ट्र मंत्री पुन्हा पाकिस्तान दौऱ्यावर; दोन दिवसांतील दुसरा दौरा