विशेष प्रतिनिधी
वेलिंग्टन : न्यूझीलंडच्य राजकारण्यांनी आपले पाय जमीनीवर असल्याचे पुन्हा एकदा सिध्द केले आहे. येथील एक महिला खासदार ज्युली अॅनी जेंटर प्रसुती वेदना सुरू झाल्यानंतर आपल्या सायकलवर स्वार होत स्वत:च रुग्णालयात दाखल झाल्या. इथे त्यांनी तासाभरातच एका गोंडस आणि स्वस्थ बाळाला जन्म दिला.Politicians on the ground, women MPs suffering from pain, went on bicycles and admitted for delivery
ज्युली यांनी सोशल मीडियावर स्वत:च ज्युली यांनी आपल्या बाळाच्या जन्माची सुंदर बातमी शेअर केली. त्यांनी म्हटले आहे की, सकाळी ३.०४ मिनिटांनी आम्ही आमच्या कुटुंबातील एका नव्या सदस्याचं स्वागत केलंय. वास्तवत: प्रसुती वेदनेत सायकलवरून जाण्याची माझी कोणतीही योजना नव्हती. परंतु, असं घडून आले.
- राजकारणी नाही, महत्वाकांक्षाही नाही, रंजन गोगोई यांनी फेटाळला मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याचा दावा
जेव्हा मी सकाळी २.०० वाजता रुग्णालयासाठी निघाले तेव्हा अधिक दबाव नव्हता. मला अधिक त्रासही होत नव्हता. परंतु, १० मिनिटांनंतर अचानक जोरात दुखू लागलं. आता मात्र माझ्या बाजुलाच एक स्वस्थ आणि आनंदी मुलगी पहुडलेली आहे, जसं तिचे वडीलही आहेत.
ज्युली अॅनी जेंटरल यांना ‘ग्रीन एमपी’ या नावानं ओळखलं जातं. पर्यावरणाविषयी आपल्या मोहिमांसाठी त्या अनेकदा चर्चेत असतात. ज्युली यांच्याकडे अमेरिका आणि न्यूझीलंड अशा दोन्ही देशांचं नागरिकत्व आहे. त्यांचा जन्म मिनसोटामध्ये झाला होता. परंतु, २००६ सालापासून त्या न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाल्या. ज्युली यांनी २०१८ मध्येही अशाच पद्धतीनं सायकलवरूनच रुग्णालयात पोहचून आपल्या बाळाला जन्म दिला होता.
Politicians on the ground, women MPs suffering from pain, went on bicycles and admitted for delivery
महत्त्वाच्या बातम्या
- सायरस पूनावाला सोडून जगातील सगळ्या धनाड्यांना ओमिक्रॉन कोरोना व्हायरस झटका, अब्जावधी रुपयांचे नुकसान
- साडेचार हजार रुपये महिना पगार असलेल्या आदिवासी आशा वर्कर फोर्ब्सच्या यादीत, जगातील सर्वाधिक प्रभावशाली महिलांच्या यादीत
- राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर १००० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला, ६ आठवड्यांत द्यावे लागणार उत्तर
- रांझना स्टार धनुष याला असुरण चित्रपटातील भूमिकेसाठी ब्रिक्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार