विशेष प्रतिनिधी
मिनेपोलिस : कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईड यांच्या हत्येप्रकरणी माजी पोलिस अधिकारी डेरेक चॉविन याला फेडरल न्यायालयाने दोषी ठरवले. चॉविन याला कमाल ४० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.Police officer guilty in George Flayed case
पोलिस अधिकारी चॉविनने ४६ वर्षीय फ्लॉईड यांची मान नऊ मिनिटे २९ सेंकदापर्यंत आपल्या गुडघ्याने दाबली आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. चॉविन हा सर्वच्या सर्व तिन्ही आरोपात दोषी असल्याचे निष्पन्न झाले.
मिनेपोलिस येथे गेल्यावर्षी २५ मे रोजी फ्लॉईड याला एका फसवणुकीच्या प्रकरणात अटक केली होती. तत्पूर्वी पोलिस अधिकारी डेरेक चॉविन याने फ्लॉईडला रस्त्यावर पकडले आणि आपल्या गुडघ्याने त्याची मान दाबली.
सुमारे ८ ते नऊ मिनिटे गुडघा हा फ्लॉईड यांच्या मानेवर होता. तेव्हा फ्लॉइडला बेड्या घातलेल्या होत्या. यावेळी ४६ वर्षीय फ्लॉईड हा सुटकेसाठी पोलिस अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करत होता आणि मानेवरचा गुडघा काढावा,अशी मागणी करत होता.
परंतु पोलिस अधिकाऱ्याने दुर्लक्ष केले आणि फ्लॉईड यांचा गुदमरून मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात तो म्हणतो की, आपला गुडघा माझ्या मानेवर आहे. मला श्वाहस घेण्यास त्रास होत आहे. पण पोलिस अधिकारी मानेवरचा गुडघा काढत नाहीत. थोड्या वेळाने फ्लॉइड याच्या हालचाली मंदावतात.
Police officer guilty in George Flayed case
महत्त्वाच्या बातम्या
- Nashik Oxygen Leak : नाशिकच्या घटनेवर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दुख, मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर
- दुर्दैवी घटनेतही राजकारण : सचिन सावंतांनी नाशिकच्या घटनेसाठी भाजपला ठरवले जबाबदार, कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर..
- Covaxin : कोरोनाच्या डबल म्युटेंटवरही कोव्हॅक्सिन परिणामकारक, संशोधनाअंती ICMRचा निष्कर्ष
- दुर्दैवाचा हृदय पिळवटून टाकणारा फेरा : नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीनंतर 22 रुग्णांचा तडफडून मृत्यू! बळींची संख्या वाढण्याची भीती
- कॅप्टन कुल धोनीच्या घरीही कोरोनाचा शिरकाव, संसर्गानंतर धोनीचे आई-वडील रांचीतील रुग्णालयात दाखल