• Download App
    Toshakhana case : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक होणार; पोलीस घरी पोहचले Police arrive at former PM Imran Khan residence at Islamabad to arrest him in the Toshakhana case

    Toshakhana case : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक होणार; पोलीस घरी पोहचले

    तोशखाना प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट जारी; पीटीआय कार्यकर्ते आक्रमक

    विशेष प्रतिनिधी

    पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी पोहचली आहे. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार तोशखाना प्रकरणात इम्रान खान यांना अटक करण्यासाठी इस्लामाबादेतील जमान पार्क येथील त्यांच्या घरी आज पोलीस पोहचली होती. Police arrive at former PM Imran Khan’s residence at Zaman Park, Islamabad to arrest him in the Toshakhana case

    तर इम्रान खान यांना अटक करण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी पोहचल्याची माहिती समजताच, पीटीआय कार्यकर्ते लाहोरमध्ये इम्रान खान यांच्या निवासस्थानी जमा झाले. कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की ते कोणत्याही परिस्थितीत इम्रान खान यांची अटक होऊ देणार नाही. तर पोलिसांनी म्हटले आहे की सरकारी कामात अडथळा आणणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.


    महत्त्वाची बातमी : देशात कोविड लक्षणं सदृश नव्या फ्लूची साथ; नागरिकांसाठी केंद्राकडून मार्गदर्शक सूचना


    तोशखाना प्रकरणी अजामीनपात्र वॉरंट जारी –

    पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना कोणत्यीही क्षणी अटक होऊ शकते. तोशाखाना प्रकरणात तहरीक-ए-इन्साफ पार्टीचे प्रमुख इम्रान खान यांना अटक करण्यासाठी पोलीस इस्लामाबादेतील त्यांच्या घरी पोहचले आहेत. इम्रान खान यांनी काही दिवसांपूर्वीच इस्लामाबाद न्यायालयात सरकारी कोषातून(तोशखाना) कोट्यवधि रुपयांच्या भेटवस्तू स्वस्तात विकल्याचा आरोप मान्य केला आहे, ज्यानंतर त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते.

    Police arrive at former PM Imran Khan’s residence at Zaman Park, Islamabad to arrest him in the Toshakhana case

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Canada : कॅनडात मंदिराच्या भिंतीवर लिहिल्या खलिस्तानी घोषणा; नगर कीर्तनापूर्वी कारवाई

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार