• Download App
    पोलंड 2 लाख युक्रेनियन शरणार्थी स्वीकारेल; पण एकही मुस्लिम घुसखोर स्वीकारणार नाही; पोलीश खासदाराची स्पष्टोक्ती!!Poland will accept 2 million Ukrainian refugees

    पोलंड 2 लाख युक्रेनियन शरणार्थी स्वीकारेल; पण एकही मुस्लिम घुसखोर स्वीकारणार नाही; पोलीश खासदाराची स्पष्टोक्ती!!

    वृत्तसंस्था

    लंडन : रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पोलंड 2 लाख युक्रेनियन शरणार्थी स्वीकारेल, पण एकही मुस्लीम बेकायदेशीर घुसखोर स्वीकारणार नाही, अशी स्पष्टोक्ती पोलंडमधील खासदार डोमिनिक ट्रॅकझॅस्की यांनी केली आहे. एका इंग्लिश खाजगी न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पोलंडची भूमिका स्पष्ट केली.Poland will accept 2 million Ukrainian refugees

    रशिया युक्रेन युद्धामध्ये जे शरणार्थी असतील त्यांना पोलंड जरूर स्वीकारेल, पण एकही मुस्लिम बेकायदेशीर घुसखोर स्वीकारणार नाही. कारण आम्हाला पोलंडमधील सामाजिक शांतता जास्त महत्त्वाची आहे. मग आम्हाला कोणीही वंशवादी – रेसिस्टर, राष्ट्रवादी – नॅशनलिस्ट असे म्हटले तरी चालेल. आम्हाला त्याची पर्वा नाही, असे डॉमिनिक यांनी ठणकावून सांगितले.

    युरोपीय समुदायाचा अध्यक्षांनी पोलंडच्या या भूमिकेवर आक्षेप नोंदवत पोलंडमधील सरकार रेसिस्ट आणि नॅशनलिस्ट आहे, अशी टीका केली होती. परंतु पोलंडमधील सत्ताधारी पक्षाच्या या खासदारांनी ही टीका पूर्णपणे फेटाळून लावली. उलट पोलंड 2 लाख युक्रेनियन शरणार्थी यांना स्वीकारायला तयार आहे, असे स्पष्ट केले. पण त्याच वेळी मुस्लिम बेकायदा घुसखोरांना स्वीकारणार नाही. पोलंडमध्ये सामाजिक वातावरण सुरक्षित आहे. येथे एकही दहशतवादी हल्ला झालेला नाही, अशा शब्दांमध्ये युरोपीय समुदायाचा अध्यक्षांना आणि संबंधित प्रश्न विचारणार्‍या न्यूज अँकरला ठणकावले.

    Poland will accept 2 million Ukrainian refugees

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या