पंतप्रधान मोदींचे यूएईमध्ये शाही थाटामाटात स्वागत करण्यात आले आहे.
विशेष प्रतिनिधी
अबुधाबी : पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा दोन दिवसांचा फ्रान्स दौरा संपवून शनिवारी (15 जुलै) संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे पोहोचले. यादरम्यान UAE चे अध्यक्ष शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद आणि PM मोदी यांच्यात द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा झाली. PM Narendra modi had a wonderful meeting with HH Sheikh Mohamed bin Zayed Al Nahyan
शेख खालिद यांच्यासोबत झालेल्या द्विपक्षीय बैठकीनंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, अबुधाबीला येऊन राष्ट्रपतींना भेटून मला आनंद झाला. तसेच, स्वागत आणि आदराबद्दल मोदींनी त्यांचे आभार मानले आणि ‘प्रत्येक भारतीय तुम्हाला खरा मित्र म्हणून पाहतो’ असे सांगितले.
मोदी म्हणाले, “आम्ही आमची भागीदारी मजबूत करण्यासाठी नवीन पुढाकार घेत आहोत. दोन्ही देशांच्या चलनांमधील व्यापार करारावर आजचा करार आमच्या मजबूत आर्थिक सहकार्य आणि विश्वासाचे प्रतिबिंब आहे.”
तत्पूर्वी, अबुधाबीमध्ये पंतप्रधान मोदी आणि UAE चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्या उपस्थितीत भारत आणि UAEच्या अधिकाऱ्यांनी अनेक सामंजस्य करारांची देवाणघेवाण केली.
PM Narendra modi had a wonderful meeting with HH Sheikh Mohamed bin Zayed Al Nahyan
महत्वाच्या बातम्या
- अर्थमंत्री अजितदादांना मंत्रालयात सहाव्या नव्हे, पाचव्या मजल्यावरचे 503 क्रमांकाचे दालन!!
- हिमाचलमध्ये पाऊस आणि पुराचा कहर; मुख्यमंत्री सुखू म्हणाले आतापर्यंत ६० हजार जणांना वाचवलं!
- तडजोड : अर्थ आणि सहकार ही दोनच मलईदार खाती राष्ट्रवादीकडे; अजितदादा अर्थमंत्री, पण जलसंपदा खाते फडणवीसांकडे, तर महसूल खाते विखेंकडेच!!;
- मिशन चंद्रयान 3 यशस्वी!!; पंतप्रधान मोदींनी फ्रान्स मधून केले शास्त्रज्ञांचे अभिनंदन!!