राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होणार
विशेष प्रतिनिधी
पोर्ट लुईस : PM Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या दोन दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर पोहोचले आहेत. जिथे पोर्ट लुईस विमानतळावर पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यासाठी मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम स्वतः विमानतळावर पोहोचले होते. जिथे त्यांनी सर्वप्रथम पंतप्रधान मोदींशी हस्तांदोलन केले आणि त्यांना मिठी मारली व त्यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदींच्या गळ्यात फुलांचा हार घालून त्यांचे स्वागत केले.PM Modi
मॉरिशसमध्ये पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट केली. ज्यामध्ये पंतप्रधान मोदींनी काही फोटोही शेअर केले. ज्यामध्ये मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम पंतप्रधान मोदींचे स्वागत करताना दिसत आहेत.
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मी मॉरिशसला पोहोचलो आहे. विमानतळावर माझे स्वागत केल्याबद्दल मी माझे मित्र पंतप्रधान डॉ. नवीनचंद्र रामगुलाम यांचा आभारी आहे. ही भेट एका मौल्यवान मित्राला भेटण्याची आणि विविध क्षेत्रात सहकार्याचे नवीन मार्ग शोधण्याची एक उत्तम संधी आहे. आज मी राष्ट्रपती धरम गोखूल आणि पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांना भेटेन आणि संध्याकाळी एका सामुदायिक कार्यक्रमाला संबोधित करेन.”
पंतप्रधान मोदींचा हा दौरा धोरणात्मक संबंध मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. या भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांच्यात सागरी सुरक्षा मजबूत करण्यावर चर्चा होईल. यासोबतच दोन्ही नेते अनेक करारांवर स्वाक्षरी करतील. याशिवाय, पंतप्रधान मोदी भारताकडून निधी मिळवलेल्या २० हून अधिक प्रकल्पांचे उद्घाटन देखील करतील.
PM Modi on two day visit to Mauritius; Warm welcome at Port Louis airport
महत्वाच्या बातम्या
- Budget : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : विकसित महाराष्ट्राचा लोकाभिमुख अर्थसंकल्प; शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, रोजगार, सामाजिक विकासाची पंचसुत्री!!
- Global civil : जागतिकस्तरावरील नागरी स्वातंत्र्य अहवालात पाकिस्तानमधील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त
- Lalit Modi : ललित मोदीला आणखी एक धक्का; ‘या’ देशाचे सरकार पासपोर्ट रद्द करणार
- मुख्यमंत्र्यांची खुर्ची मनातून काही जाईना; पण दोघांकडेही स्वतंत्र राजकीय कर्तृत्वाची वानवा!!