• Download App
    पंतप्रधान मोदी इजिप्त दौऱ्यावर; कैरो विमानतळावर ‘’गार्ड ऑफ ऑनर’’ने स्वागत! PM Modi on Egypt visit Welcomed by Guard of Honor at Cairo Airport

    पंतप्रधान मोदी इजिप्त दौऱ्यावर; कैरो विमानतळावर ‘’गार्ड ऑफ ऑनर’’ने स्वागत!

    तब्बल २६ वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान द्विपक्षीय भेटीसाठी इजिप्तला पोहोचले

    विशेष प्रतिनिधी

    कैरो : तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी इजिप्तच्या दोन दिवसांच्या राज्य दौऱ्यासाठी कैरो येथे शनिवारी सायंकाळी पोहोचले. पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच इजिप्त दौरा आहे. कैरो विमानतळावर इजिप्तच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले, त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. PM Modi on Egypt visit Welcomed by Guard of Honor at Cairo Airport

    तब्बल २६ वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान द्विपक्षीय भेटीसाठी इजिप्तला पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदींची कैरोमध्ये इजिप्तचे पंतप्रधान मुस्तफा मैडबोलींशी राउंडटेबल कॉन्फरन्स पार पडली. यानंतर त्यांनी भारतीय समुदायातील लोकांशी संवाद साधला.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अल हकीम मशिदीला भेट देतील. यानंतर ते हेलिओपोलिस वॉर सेमेटरीला भेट देतील. त्यानंतर ते इजिप्शियन प्रेसिडेंसीमध्ये आयोजित कार्यक्रमात सहभागी होतील. याशिवाय मोदी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष एल सिसी यांचीही भेट घेणार आहेत.

    PM Modi on Egypt visit Welcomed by Guard of Honor at Cairo Airport

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Muhammad Yunus : मोहम्मद युनूस म्हणाले- बांगलादेश फसवणुकीचा कारखाना बनला, इथे सर्व काही नकली, देशाच्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेला मोठे नुकसान

    Bangladesh Election : बांगलादेशात बीएनपी आणि जमात कार्यकर्त्यांमध्ये हिंसक संघर्ष; पुढील खुर्च्यांवर बसण्यासाठी भांडले, एकाचा मृत्यू, 65 जखमी

    Melania Trump : मेलानिया ट्रम्प यांची डॉक्युमेंटरी ब्रिटनमध्ये फ्लॉप; लंडन प्रीमियरमध्ये फक्त 1 तिकीट विकले, अमेझॉनने ₹340 कोटींना हक्क विकत घेतले होते