विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क – अमेरिकेतील शल्यचिकित्सकांना जनुकीयरित्या विकसित केलेल्या डुकराच्या किडनीचे मनुष्यात यशस्वी प्रत्यारोपण करण्यात यश आले आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असून प्रत्यारोपण केलेली किडनी व्यवस्थित काम करत असल्याचेही आढळले.Pigs kidney puts in Human being
वैद्यकशास्त्रातील या क्रांतिकारक प्रयोगामुळे अनेक गंभीर रुग्णांना नवीन अवयव मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.न्यूयॉर्कमधील एनवाययू लॅंगोन प्रत्यारोपण केंद्रात अमेरिकेतील ही पहिलीच किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. व्हेंटिलेटरवर असलेल्या एका ब्रेन-डेड रुग्णावर केलेले हे अनोखे प्रत्यारोपण ‘मैलाचा दगड’ ठरले आहे.
केंद्राचे संचालक डॉ. रॉबर्ट मॉन्टगोमेरी म्हणाले,की जनुकीयरित्या विकसित केलेल्या डुकरातील ही किडनी सामान्यत: मानवी शरीर नाकारणार नाही, अशा प्रकारची आहे. ब्रेन डेड रुग्णाच्या ओटीपोटाबाहेर पायाच्या वरील बाजूच्या रक्तवाहिनीला ही किडनी जोडण्यात आली. किडनीने तत्काळ मूत्रनिर्मिती व टाकाऊ पदार्थ तयार करण्यास सुरुवात केली.
किडनीचे थेट मानवी शरीराच्या आतमध्ये प्रत्यारोपण केलेले नाही. मात्र, किडनी शरीराच्या बाहेर काम करत असल्याने ती शरीरातही काम करू शकत असल्याचे संकेत आहेत. किडनी अपेक्षेपेक्षा चांगल्या पद्धतीने काम करत आहे. सौरऊर्जा व हवेप्रमाणे जनुकीयदृष्ट्या विकसित केलेली डुकरे अवयवांचा शाश्वत स्रोत्र ठरू शकतात.
Pigs kidney puts in Human being
महत्त्वाच्या बातम्या
- UP Election 2022 : प्रियांका गांधींची मोठी घोषणा, उत्तर प्रदेशात सत्ता आल्यास मुलींना देणार स्मार्टफोन आणि स्कूटी
- पाकिस्तानात वाढत्या महागाईमुळे विरोधक उतरले रस्त्यावर, जुलमी इम्रान सरकारपासून सुटका मिळण्याची मागणी
- सर्वोच्च न्यायालयाचे CJI रमण्णा यांनी कायदामंत्र्यांसमोरच पायाभूत सुविधांवर केला सवाल, म्हणाले – ‘न्यायालयांसाठी उत्तम पायाभूत सुविधा ही फक्त एक कल्पना!’
- महागाईचा परिणाम : 14 वर्षांनंतर वाढणारे आगपेटीचे दर, एका झटक्यात दुप्पट होणार किंमत