• Download App
    दानशूर बिल गेट्स : तब्बल १.६० लाख कोटी रुपये करणार दान, श्रीमंतांच्या यादीत नाव नको म्हणून निर्णय|Philanthropist Bill Gates: Will donate as much as 1.60 lakh crore rupees, decision not to be named in the rich list

    दानशूर बिल गेट्स : तब्बल १.६० लाख कोटी रुपये करणार दान, श्रीमंतांच्या यादीत नाव नको म्हणून निर्णय

    वृत्तसंस्था

    न्यूयॉर्क : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक बिल गेट्स यांनी तब्बल २००० कोटी डॉलर (सुमारे १.६० लाख कोटी रुपये) दान करण्याची घोषणा केली आहे. ही रक्कम बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनला दिली जाईल. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स म्हणाले, मी आपली पूर्ण संपत्ती फाउंडेशनला दान करू इच्छितो. केवळ स्वत: आणि कुटुंबाच्या खर्चासाठी लागणारा पैसा ठेवू इच्छितो. जगातील श्रीमंतांच्या यादीत नाव सदैव राहावे, असा माझा हेतू नाही.Philanthropist Bill Gates: Will donate as much as 1.60 lakh crore rupees, decision not to be named in the rich list



    स्रोत सामाजिक कार्यासाठी देणे नैतिक जबाबदारी

    गेट्स यांनी ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले की, पैसे दान करणे हा कोणता त्याग नाही. मोठ्या आव्हानांच्या उपायात सहभागी होण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे. लोकांचे जीवनमान उंचावण्यात भूमिका राहावी यासाठी माझे स्रोत समाजासाठी परत करणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे.

    Philanthropist Bill Gates: Will donate as much as 1.60 lakh crore rupees, decision not to be named in the rich list

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या