• Download App
    Coronavirus and Vaccine : कॅनडात लहान मुलांना फायझरची लस ; लसीकरणास परवानगी देणारा पहिला देश |Pfizer vaccine for children in Canada

    Coronavirus and Vaccine : कॅनडात लहान मुलांना फायझरची लस ; लसीकरणास परवानगी देणारा पहिला देश

    वृत्तसंस्था

    ओटावा : जगभरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा होत आहे. या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कॅनडातील लहान मुलांना फायझर कंपनीची लस देण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा तेथील सरकारने केली.Pfizer vaccine for children in Canada

    कॅनडाच्या ड्रग रेग्युलेटरने 12-15 वयोगटातील मुलांना फायझर कंपनीची लस देण्यास मान्यता दिली. असा निर्णय घेणारा कॅनडा जगातील पहिला देश ठरला आहे. कॅनडा व्यतिरिक्त, फायझर-बायोटेनटेकची कोरोना लस अमेरिकेत 12-15 वर्षांच्या मुलांना देण्यास परवानगी दिली जाऊ शकते.



    लस अधिक प्रभावी असल्याचा दावा

    मुलांसाठी फायझरच्या लसीची चाचणी जानेवारी ते मार्च दरम्यान झाली. ही लस मुलांवर शंभर टक्के प्रभावी असल्याचा दावा केला जात आहे. फायझर व्यतिरिक्त, फार्मा कंपन्या मॉडेर्ना आणि जॉन्सन आणि जॉन्सन देखील मुलांच्या लसीची चाचणी घेत आहेत. त भारतात कोवाक्सिनच्या मुलांवर चाचण्या सुरु आहेत.

    Pfizer vaccine for children in Canada

    Related posts

    PM Suicide : नॉर्वेच्या माजी पंतप्रधानांचा आत्महत्येचा प्रयत्न; एपस्टीन फाईलमध्ये नाव आले होते; भ्रष्टाचाराच्या प्रकरणात 10 वर्षांची शिक्षा शक्य

    US Claims China : अमेरिकेचा दावा- चीनने 2020 मध्ये गुप्तपणे अणुचाचणी केली; ताकद वाढवतोय, 6 वर्षांत 400 शस्त्रे बनवली

    US Nuclear : अमेरिकेच्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या विमानवाहू जहाजावर शौचालयांची समस्या; डिझाइनमधील दोषामुळे शौचालये जाम