वृत्तसंस्था
ओटावा : जगभरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा होत आहे. या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कॅनडातील लहान मुलांना फायझर कंपनीची लस देण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा तेथील सरकारने केली.Pfizer vaccine for children in Canada
कॅनडाच्या ड्रग रेग्युलेटरने 12-15 वयोगटातील मुलांना फायझर कंपनीची लस देण्यास मान्यता दिली. असा निर्णय घेणारा कॅनडा जगातील पहिला देश ठरला आहे. कॅनडा व्यतिरिक्त, फायझर-बायोटेनटेकची कोरोना लस अमेरिकेत 12-15 वर्षांच्या मुलांना देण्यास परवानगी दिली जाऊ शकते.
लस अधिक प्रभावी असल्याचा दावा
मुलांसाठी फायझरच्या लसीची चाचणी जानेवारी ते मार्च दरम्यान झाली. ही लस मुलांवर शंभर टक्के प्रभावी असल्याचा दावा केला जात आहे. फायझर व्यतिरिक्त, फार्मा कंपन्या मॉडेर्ना आणि जॉन्सन आणि जॉन्सन देखील मुलांच्या लसीची चाचणी घेत आहेत. त भारतात कोवाक्सिनच्या मुलांवर चाचण्या सुरु आहेत.