Pfizer Oral Medicine For Covid19 : अवघे जग सध्या कोरोना महामारीशी संघर्ष करत आहे. कोरोनावर लस आलेल्या असल्या तरी यावर अद्याप औषध आणण्यासाठी जागतिक स्तरावर संशोधन सुरू आहे. यादरम्यान अमेरिकेतील दिग्गज औषध निर्माती कंपनी फायझरने म्हटले आहे की, कोरोनाविरुद्ध तोंडाद्वारे घेण्याचे प्रभावी औषध त्यांनी तयार केले असून वर्षअखेरपर्यंत ते उपलब्ध होण्याची शक्यता आहे. याबाबत कंपनीचे सीईओ अल्बर्ट म्हणले की, फायझर कंपनी दोन अँटी व्हायरल औषधांवर काम करत आहे, त्यापैकी एक तोंडाद्वारे घेण्याचे असून दुसरे इंजेक्शन आहे. Pfizer Oral Medicine For Covid19 May Be ready by the end of this year, says pfizer ceo
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अवघे जग सध्या कोरोना महामारीशी संघर्ष करत आहे. कोरोनावर लस आलेल्या असल्या तरी यावर अद्याप औषध आणण्यासाठी जागतिक स्तरावर संशोधन सुरू आहे. यादरम्यान अमेरिकेतील दिग्गज औषध निर्माती कंपनी फायझरने म्हटले आहे की, कोरोनाविरुद्ध तोंडाद्वारे घेण्याचे प्रभावी औषध त्यांनी तयार केले असून वर्षअखेरपर्यंत ते उपलब्ध होण्याची शक्यता आहे. याबाबत कंपनीचे सीईओ अल्बर्ट म्हणले की, फायझर कंपनी दोन अँटी व्हायरल औषधांवर काम करत आहे, त्यापैकी एक तोंडाद्वारे घेण्याचे असून दुसरे इंजेक्शन आहे.
ओरल औषध जास्त प्रभावी
अल्बर्ट यांनी सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “आम्ही दोन अँटी व्हायरल औषधांवर काम करत आहोत, एक इंजेक्शन आहे आणि दुसरे ओरल आहे. ओरल म्हणजेच तोंडाद्वारे घेण्याच्या औषधाचे बरेच फायदे आहेत. त्यातील एक फायदा म्हणजे तुम्हाला इंजेक्शन घेण्यासाठी जसे रुग्णालयात जावे लागते, तशी आवश्यकता राहणार नाही. तुम्ही ते घरीही घेऊ शकाल.”
वर्षअखेरपर्यंत मंजुरी मिळण्याची शक्यता
अल्बर्ट म्हणाले, “जर सर्व काही ठीक राहिले, याच वेगाने चाचण्या सुरू राहिल्या आणि नियामकांनी वेळेवर मंजुरी दिली तर ही औषधे वर्षाच्या अखेरपर्यंत उपलब्ध होऊ शकतील.” तथापि, कोरोनाविरुद्ध उपचारांसाठी सध्या फक्त एक अँटी व्हायरल औषध रेमडेसिव्हिरला मंजुरी मिळालेली आहे. याची निर्मिती गिलियड सायन्स केलेली आहे. गतवर्षी मेमध्ये आपत्कालीन वापरासाठी या इंजेक्शनला मान्यता देण्यात आली होती. फायझरचे सीईओ असेही म्हणाले की, सध्याच्या पर्यायांपेक्षा त्यांचे औषध व्हायरसच्या अनेक रूपांवर जास्त प्रभावी ठरू शकते.
Pfizer Oral Medicine For Covid19 May Be ready by the end of this year, says pfizer ceo
महत्त्वाच्या बातम्या
- बॉलीवूड अभिनेता जिमी शेरगिलला लुधियानात अटक, कोरोनाचे नियम मोडल्याचा आरोप
- परभणी जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटवर झाड पडून गळती, कर्मचाऱ्यांनी तत्परतेने वाचवले १४ रुग्णांचे प्राण
- Corona Updates In India : भारतात एकाच दिवसात कोरोनामुळे ३२९३ मृत्यू, ३.६० लाखांहून जास्त नव्या रुग्णांची नोंद
- भूकंप : आसाममध्ये ६.४ तीव्रतेचा भूकंप, बंगाल-बिहारमध्येही दहशतीचे वातावरण
- ठाण्यातील प्राइम क्रिटिकेअर रुग्णालयात भीषण आग, दुसरीकडे शिफ्ट करताना चार रुग्णांचा मृत्यू