• Download App
    नेपाळमध्ये चक्क विमानाला द्यावा लागला प्रवाशांना धक्का|People push plane in Nepal

    नेपाळमध्ये चक्क विमानाला द्यावा लागला प्रवाशांना धक्का

    विशेष प्रतिनिधी

    काठमांडू – रस्त्यावर मोटारगाडी बंद पडली की धक्का दिला जातो यात काही नवीन नाही. पण अमेरिकेत चक्क विमानाला अशा प्रकारे धक्का देण्याची वेळ प्रवाशांवर आल्याने त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.People push plane in Nepal

    नेपाळच्या एका विमानतळावरील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून त्यात लोक टायर फुटलेल्या एका विमानाला धक्का देऊन ते बाजूला नेत असल्याचे दिसतात. नेपाळच्या बजुराच्या कोल्टी विमानतळावर हा प्रकार घडला आहे. या व्हिडिओत प्रवासी आणि सुरक्षा कर्मचारी हे कोल्टीच्या धावपट्टीवर उभ्या असलेल्या विमानाला धक्का देतात.



    नेपाळचे पत्रकार सुशील भट्टराय यांच्या मते, तारा एअरचे विमान टायर फुटल्यानंतर धावपट्टीवरच उभे राहिले. त्यामुळे अन्य विमानांना उड्डाण करण्यास अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे तेथील प्रवाशांनी आणि कर्मचाऱ्यांनी त्या विमानाला धक्का देत बाजूला आणला. विशेष म्हणजे विमान बाजूला करण्याचे उपकरण विमानतळावर उपलब्ध नसल्याने विमानाला धक्का देण्याची वेळ लोकांवर आली.

    तारा एअरलाइन्स ही नेपाळची विश्व्सनीय एअरलाइन्स समजली जाते. परंतु नागरी उड्डयन मंत्रालयाच्या दुर्लक्षामुळे विमान कंपन्या वाहतूक सुरळीत ठेऊ शकत नसल्याचे म्हणणे आहे. अनेक विमातळावर सुविधा नसल्याने अडचणी येत असल्याच्या तक्रारी विमान कंपन्या करत आहेत.

    People push plane in Nepal

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या