इस्त्राएलबरोबर पॅलेस्टाईनचे अस्तित्व ठेऊन दोन स्वतंत्र देश हेच गाझापट्टीतील संघर्षावर उत्तर आहे. इस्त्राएलचे अस्तित्व मान्य होत नाही तोपर्यंत शांतता नांदणार नाही. अमेरिको इस्त्राएलच्या सुरक्षेबाबत कटिबध्द आहे. या धोरणात कोणताही बदल झालेला नाही असे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सांगितले आहे.Peace will not be possible without Israel’s independent existence, says US President Joe Biden
विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : इस्त्राएलबरोबर पॅलेस्टाईनचे अस्तित्व ठेऊन दोन स्वतंत्र देश हेच गाझापट्टीतील संघर्षावर उत्तर आहे. इस्त्राएलचे अस्तित्व मान्य होत नाही तोपर्यंत शांतता नांदणार नाही.
अमेरिको इस्त्राएलच्या सुरक्षेबाबत कटिबध्द आहे. या धोरणात कोणताही बदल झालेला नाही असे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सांगितले आहे.
व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना बायडेन म्हणाले इस्त्राएल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्षाला युध्दविराम लागला असला तरी दोन्ही देशांचे स्वतंत्र अस्तित्व आणि इतर देशांनी इस्त्राएलचे अस्तित्व मान्य करणे हाच या भागातील शांततेसाठी उपाय आहे.
जोपर्यंत हे मान्य केले जात नाही तोपर्यंत शांतता नांदणार नाही.इस्त्राएल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये इजिप्तच्या मध्यस्तीने युध्दबंदी झालीआहे. द्विपक्षीय चर्चेस इस्त्राएलच्या मंत्रीमंडळाने एकमताने मान्यता दिली आहे.
याबाबत ज्यो बायडेन यांचे हे वक्तव्य आले आहे. युध्दबंदीचे आपण स्वागत करतो असे सांगून ते म्हणाले, पॅलेस्टाईनमध्ये झालेल्या नुकसानीच्याा पार्श्वभूमीवर तेथेही नव्याने उभारणीसाठी अमेरिका मदत करेल.
मानवतावादी दृष्टिकोनातून गाझापट्टीतील नागरिकांना सर्वतोपरी मदत केली जाईल.यापूर्वी बायडेन म्हणाले होते की, स्वत: च्या संरक्षणाचा इस्रायलला हक्क आहे. जेव्हा आपल्या देशावर हजारो रॉकेट्स येत असतील तेव्हा आपल्याला स्वत:चे रक्षण करण्यासाठी पावले उचलावी लागतील.