मुलांना गाडीत एकटे सोडून शॉपींग किंवा अन्य कामांसाठी जाणारे पालक अनेकदा दिसतात. मात्र, अनेकदा गाडीमध्ये ऑक्सिजनची कमतरता निर्माण होऊन मुलांचा मृत्यू होण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे आता मुलांना एकटे सोडून जाणाऱ्या पालकांना दोन कोटी रुपये दंड आणि दहा वर्षांची शिक्षा होणार आहे.Parents fined Rs 2 crore and sentenced to 10 years for leaving children alone in car
विशेष प्रतिनिधी
दुबई : मुलांना गाडीत एकटे सोडून शॉपींग किंवा अन्य कामांसाठी जाणारे पालक अनेकदा दिसतात. मात्र, अनेकदा गाडीमध्ये ऑक्सिजनची कमतरता निर्माण होऊन मुलांचा मृत्यू होण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे आता मुलांना एकटे सोडून जाणाऱ्या पालकांना दोन कोटी रुपये दंड आणि दहा वर्षांची शिक्षा होणार आहे.
संयुक्त अरब अमिरातीने हा का यदा केला आहे. याचे कारण म्हणजे सध्या संयुक्त अरब अमिरातीत उन्हाळा अत्युच्च पातळीवर आहे. ५१.२ अंश इतकी उच्चांकी तापमानाची नोंद नुकतीच झाली होती. या उन्हामुळे दरवर्षी अनेक लहान मुले मृत्युमुखी पडतात. पालकांचा निष्काळजीपणा त्याला कारणीभूत ठरतो. पालक मोटार घेऊन घराबाहेर पडतात.
मुले झोपली अशातील तर त्याला उन्हाचा त्रास नको म्हणून गाडीतच झोपून ठेवतात. परंतु, पालकांची ही काळजी मुलांसाठी जीवघेणी ठरते. याचे कारण म्हणजे उन्हामुळे गाडीतील ऑक्सिजनची पातळी कमी होते. त्यामुळे मुलांचा मृत्यू होण्याच्या घटनाही घडल्या आहेत.
हे प्रकार टाळण्यासाठी आता संयुक्त अरब अमिरातीने नवीन नियम केला आहे. त्यानुसार, मुलांना गाडीमध्ये एकटे सोडून जाणाऱ्या पालकांना १० लाख दिरहम म्हणजे दोन को टी रुपये दंड आणि दहा वर्षांची शिक्षा होणार आहे.
आरोग्य आणि सार्वजनिक संरक्षण मंत्रालयाचे फॅमिली मेडिसिन स्पेशालिस्ट डॉ. अदेल सइद सजवानी म्हणाले, मुलांना पार्क केलेल्या गाड्यांमध्ये सोडून देणं ही घटना जगभरातल्या पालकांमध्ये घडते. काही पालकांची नेहमीची सवय असते.
काही कुटुंबात तर कोणीतरी मुलाला घेऊन येईल म्हणून मुले विसरण्याचे प्रकारही घडत्ले आहे. त्यामुळे मागच्या सिटवर झोपलेल्या मुलांना सोडून सगळे बाहेर जातात. त्यामुळे आता हा निर्णय घेण्यात आला आहे.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, बाहेरचं तापमान चाळीस अंश सेल्सिअस असले तरी उष्णतेमुळे बंद कारमधील तापमान केवळ दहा मिनिटांतच साठ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकतं. मूले जर अशा बंद कारमध्ये जास्त वेळ राहिलं तर गुदमरल्यामुळे, उष्माघातामुळे किंवा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्याचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे मुलांना कारमध्ये एकटे सोडण्याआधी किमान दहादा तरी पालकांनी विचार करावा.
Parents fined Rs 2 crore and sentenced to 10 years for leaving children alone in car
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाचे उगमस्थान असलेले वुहान पुन्हा मास्क नसलेल्या हजारो मुलांच्या गर्दीने चर्चेत
- ड्रॅगनच्या मुसक्या आवळण्यासाठी नाटोची सदस्य राष्ट्रे सरसावली, वर्चस्ववादाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन
- चीनविरुद्धच्या संघर्षात धारातीर्थी पडलेले हुतात्मा संतोष बाबूंचा सूर्यापेटमध्ये पुतळा
- बांगलादेशने भारतासमवेतच्या सीमाबंदीत केली ३० जूनपर्यंत वाढ
- पाकिस्तान ठरतोय गाढवांचा देश, चीनमुळे संख्येत विक्रमी वाढ