विशेष प्रतिनिधी
काबूल: अफगणिस्थानचा ताबा घेतलेल्या तालीबान्यांना पंजशीरमधील नॉर्दन अलायन्सने चांगलेच रोखले आहे. पंजशीरवरील पंजशीर खोऱ्यावरील आक्रमणाची धुरा सांभाळणारा तालिबानचा म्होरक्या सध्या वेढ्यात अडकला आहे, असा दावा नॅशनल रेझिस्टन्स फोर्सच्या वतीने करण्यात आला आहे.Panjshir tough Taliban, besieges Northern Alliance
अफगाणिस्तानमधील तालिबानी राजवटीला आव्हान देणाºया पंजशीर राज्याचा ताबा घेण्यासाठी तालिबानने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पंजशीरचा पाडाव करण्यासाठी आलेल्या तालिबानींना चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी नॉर्दर्न अलायन्सने केली आहे. या संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की कारी फसीह सलाहउद्दीन हा म्होरक्या उत्तर सलांग भागात वेढ्यात अडकला आहे. त्याच्याकडे पंजशीर खोऱ्यावर आक्रमणाची धुरा तालिबानने सोपवली आहे. त्याला जिवंत पकडले जाईल अथवा युद्धात मारले जाईल.
अफगाणिस्तानचे स्वयंघोषित हंगामी राष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी म्हटले आहे की, तालिबान्यांनी पंजशीर खोऱ्याच्या तोंडावर सैन्य आणले खरे, पण आंद्राब खोऱ्यात ते वेढ्यात अडकले आहेत. ते सुखरूप बाहेर पडण्याची शक्यता कमी आहे. सलांग महामार्ग नॅशनल रेझिस्टन्स फोर्सने बंद केला असून, या भागात येणे टाळावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
रविवारी रात्री उत्तर सलांग भागातील सलांग नदीवरील दोन पूल उडवून लावले आहेत. त्यामुळे तालिबानींना काबूलहून रसद पुरवठा बंद झाला आहे, असा दावा नॉर्दर्न अलायन्सने केला आहे. पंजशीर भागात सध्या प्रामुख्याने ताजिक वंशीय योद्धे तालिबानशी लढत आहेत. त्यांनी आता उझबेक, हाजरा आणि इतर वंशीयांनाही तालिबानविरोधात एकजूट करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
Panjshir tough Taliban, besieges Northern Alliance
महत्त्वाच्या बातम्या
- इन्फोसिसचे शेअर्स उच्चांकी पातळीवर, १०० बिलीयन डॉलर्सची कंपनी, बाजारमूल्य ७.४५ कोटी रुपये
- युवराजांच्या बालहट्टाची किंमत १६८ कोटी रुपये, सायकल ट्रॅकला महामार्गापेक्षा ५०० पट अधिक खर्च
- ‘योगी नाही हा तर भोगी… असं वाटलं त्याच चपलेनं थोबाड फोडावं’ : केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल, अटकेची मागणी
- राणे यांच्यावर आकसाने कारवाई, प्रथमच केंद्रीय मंत्र्याला अटक ; राणेंच्या अटकेनंतर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया