विशेष प्रतिनिधी
किव्ह : ऑगस्टमध्ये होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात लष्करातील महिला जवानांकडून उंच टाचांचे बूट घालून संचलन करण्याचा सराव करून घेतला जात असल्यावरून युक्रेनमध्ये वाद निर्माण झाला आहे. अशा प्रकारच्या बूटांमुळे महिलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, अशी टीका होत आहे.Panic in army in Ukrane
युक्रेनच्या लष्करात ५७ हजार महिला आहेत.सोविएत महासंघापासून युक्रेनला स्वातंत्र्य मिळाले त्या घटनेला २४ ऑगस्टला ३० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त होणाऱ्या संचलनात महिला जवानांची तुकडी उंच टाचांचे बूट घालून संचलन करणार आहे.
त्यासाठी त्यांचा दिवसातून दोन वेळेस सरावही करून घेतला जात आहे. असे बूट घालून संचलन करणे सुरुवातील अवघड जात असले तरी प्रयत्नांनंतर ते शक्य होईल, असे लष्करी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
मात्र, अनेक माध्यमांनी आणि संसद सदस्यांनी निर्णयाला विरोध केला आहे. महिलांच्या आरोग्यावर यामुळे परिणाम होणार असल्याचे निर्णयाच्या विरोध करणाऱ्यांनी म्हटले आहे.
संरक्षण मंत्रालयाने मात्र निर्णयाचे समर्थन करताना इतर देशांमधील महिला जवान उंच टाचांचे बूट घालत असल्याची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. मात्र, या देशांमधील महिला जवान असे बूट संचलनासाठी वापरत नाहीत, असे विरोधकांनी निदर्शनास आणून दिले आहे.
Panic in army in Ukrane
महत्त्वाच्या बातम्या
- कायदेभंग केला असेल, तर ट्विटरवर कारवाईचा केंद्र सरकारला पूर्ण अधिकार; दिल्ली हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
- मंत्री बनताच सिंधियांचे फेसबुक अकाउंट हॅक, जुने मोदी सरकारविरोधी व्हिडिओ अपलोड, पुन्हा रिकव्हरही झाले
- उत्तीर्ण मराठी तरुणांना रेल्वेमध्ये रुजू करून घ्या ; नांदगांवकर
- पदभार स्वीकारताच नवे आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांचा ट्विटरला इशारा, म्हणाले – देशातील कायद्यांचे पालन करावेच लागेल
- फीच्या तक्रारी संदर्भात आमचा पाठपुरावा ; वर्षा गायकवाड