पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इम्रान खान यांना खरा चोर म्हटले आहे. शाहबाज यांच्या म्हणण्यानुसार, इम्रान खान यांनी दुबईमध्ये पाकिस्तानच्या तिजोरीत जमा केलेल्या 14 कोटी रुपयांच्या भेटवस्तू (पाकिस्तानी चलन) विकल्या आहेत आणि सरकारकडे याचे पुरावे आहेत.Pakistan’s new PM says Imran sells 14 crore government gifts in Dubai, many secrets to be revealed
वृत्तसंस्था
इस्लामाबाद : पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इम्रान खान यांना खरा चोर म्हटले आहे. शाहबाज यांच्या म्हणण्यानुसार, इम्रान खान यांनी दुबईमध्ये पाकिस्तानच्या तिजोरीत जमा केलेल्या 14 कोटी रुपयांच्या भेटवस्तू (पाकिस्तानी चलन) विकल्या आहेत आणि सरकारकडे याचे पुरावे आहेत.
शाहबाज यांचा हा दावा अजिबात धक्कादायक नाही. याचे कारण असे की, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पहिल्यांदाच अनेक पाकिस्तानी माध्यमांनी सरकारी तिजोरीतील (तोशाखाना) काही मौल्यवान वस्तू विकल्याचा दावा केला होता. विशेष म्हणजे इम्रान यांनी कधीही शाहबाज शरीफ यांच्याशी हस्तांदोलन केले नाही, कारण त्यांच्या दृष्टीने शरीफ कुटुंब चोर, डाकू आणि दरोडेखोर आहे. आता खान यांची खुर्ची गेल्याने त्यांचे कारनामे चव्हाट्यावर येऊ लागले आहेत.
काय म्हणाले शाहबाज?
जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, गुरुवारी शाहबाज इस्लामाबादमध्ये एका रोजा इफ्तार पार्टीत सहभागी झाले होते. यावेळी काही पत्रकारही उपस्थित होते. काही चर्चेत एका पत्रकाराने शाहबाज यांना सरकारी तिजोरीतील गडबडीच्या बातम्यांवर प्रश्न विचारला. यावर, नवे वजीर-ए-आझम शाहबाज म्हणाले- इम्रान खानने दुबईत 14 कोटी रुपयांच्या भेटवस्तू विकल्या आहेत. सरकारकडे पुरावे आहेत.
वृत्तानुसार, शाहबाज यांनी पत्रकारांना असेही सांगितले की विकल्या गेलेल्या भेटवस्तूंमध्ये हिऱ्यांचे दागिने, बांगड्या आणि मौल्यवान घड्याळांचा समावेश आहे. शाहबाज यांनी कबूल केले की, एकदा त्यांनाही एक मौल्यवान मनगटी घड्याळ भेट म्हणून मिळाले होते, पण ते त्यांनी सरकारी तिजोरीत जमा केले होते. शाहबाज म्हणाले – मला काहीही लपवायची गरज नाही.