• Download App
    पाकिस्तानचे इम्रान खान यांचे सरकार केव्हाही कोसळणार; आणखी दोन पक्षांनी साथ सोडली Pakistan's Imran Khan's government will collapse anytime; Two more parties left

    पाकिस्तानचे इम्रान खान यांचे सरकार केव्हाही कोसळणार; आणखी दोन पक्षांनी साथ सोडली

    वृत्तसंस्था

    इस्लामाबाद : पाकिस्तानचे इम्रान खान यांचे सरकार केव्हाही कोसळण्याची शक्यता वाढली आहे. त्यांची साथ आणखी दोन पक्षांनी सोडली आहे. Pakistan’s Imran Khan’s government will collapse anytime; Two more parties left

    पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारचा पाठिंबा आणखी दोन पक्षांनी काढून घेतल्याने त्यांची गच्छंती नक्की आहे. इम्रान बुधवारी सायंकाळी देशाला संबोधित करणार होते. पण लष्करप्रमुख कमर बाजवा व आयएसआय चीफ नदीम अंजुम यांच्या भेटीनंतर हे संबोधनही रद्द करण्यात आले.

    यापूर्वी ७ खासदार असलेला पक्ष एमक्यूएम-पीने समर्थन काढून घेतले. ५ खासदार असलेल्या बीएपीनेही समर्थन काढले. आता पीटीआय आघाडीत फक्त १६७ खासदार आहेत. तर विरोधकांकडे १८० आहेत. बहुमतासाठी १७२ पाहिजेत. इम्रानचे मित्र जहांगीर तरीन यांनीही केंद्र व पंजाबातून समर्थन काढले.

    लष्कराच्या इशाऱ्यावर चालणारे पीएमएल-क्यू आणि बीएपीने पाठिंबा मागे घेतल्याने स्पष्ट होते की इम्रान यांना लष्कराशी संघर्ष करणे महागात पडले. पंजाबमध्ये इम्रान यांनी मुख्यमंत्री हटवून पीएमएल-क्यूच्या परवेज इलाहींना हे पद दिले. पण तेथील आघाडी नाराज झाली.परिणामी पंजाबमध्ये इम्रानचा पक्ष सरकार वाचवू शकणार नाही.

    Pakistan’s Imran Khan’s government will collapse anytime; Two more parties left

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bangladesh : बांगलादेशात हिल्सा माशांच्या बचावासाठी वॉरशिप तैनात; हेलिकॉप्टरद्वारे देखरेख सुरू

    Nobel Prize : 3 अमेरिकी शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर; इलेक्ट्रिक सर्किट्समधील क्वांटम टनेलिंग आणि ऊर्जा पातळीचा शोध

    Cuttack : ओडिशाच्या कटकमध्ये हिंसाचारामुळे मोठा तणाव; प्रतिबंधात्मक आदेश लागू, विहिंप रॅलीत हिंस, 25 जखमी