president ashraf ghani : तालिबानच्या वाढत्या धोक्यामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात वाकयुद्ध रंगले आहे. तालिबानचे समर्थन केल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि तिथल्या सैन्यावर आता अफगाणचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी संतापले आहेत. उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथे आयोजित आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेत ते म्हणाले की, गेल्या महिन्यात पाकिस्तानमधील 10,000 हून अधिक जिहादी सैनिक अफगाणिस्तानात दाखल झाले आहेत. Pakistan sends 10 thousand jihadi fighter in afghanistan says president ashraf ghani imran khan
वृत्तसंस्था
काबूल : तालिबानच्या वाढत्या धोक्यामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात वाकयुद्ध रंगले आहे. तालिबानचे समर्थन केल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि तिथल्या सैन्यावर आता अफगाणचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी संतापले आहेत. उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथे आयोजित आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेत ते म्हणाले की, गेल्या महिन्यात पाकिस्तानमधील 10,000 हून अधिक जिहादी सैनिक अफगाणिस्तानात दाखल झाले आहेत.
काबूल टाईम्सच्या वृत्तानुसार, शुक्रवारी जेव्हा घनी यांनी मध्य आणि दक्षिण एशिया प्रादेशिक संपर्क परिषदेत हे आरोप केले तेव्हा इम्रान खानदेखील तेथे उपस्थित होते. अफगाणिस्तानावरील तालिबानचा कब्जा पाकिस्तानच्या हिताचा नाही, असे पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या सेनापतींनी वारंवार आश्वासन दिले आहे, असे घनी म्हणाले. तालिबान्यांना वाटाघाटी करण्याच्या टेबलावर आणण्यासाठी त्यांनी आपली शक्ती वापरण्याविषयी म्हटले, पण तसे करता आले नाही. आणि आता तालिबानला पाठिंबा देणाऱ्या संघटना अफगाण लोक आणि देशाच्या संपत्तीचा विनाश करत आहेत.
उपराष्ट्रपतींनीही पाकिस्तानवर व्यक्त केला संताप
राष्ट्रपती म्हणाले की, अफगाणिस्तान तालिबान आणि त्याच्या समर्थकांवर कारवाई करण्यास तयार आहे. जोपर्यंत त्यांना कळत नाही की राजकीय समाधान हा एकमेव मार्ग आहे. गुरुवारी तत्पूर्वी देशाचे उपराष्ट्रपती अम्रुल्लाह सालेह म्हणाले की, पाकिस्तानचे हवाई दल क्षेपणास्त्र हल्ला करून अफगाण सैन्याला धोका देत आहे. अफगाण सैनिकांनी स्पिन बोल्दक परिसरातून तालिबान्यांना हाकलून लावण्याचा प्रयत्न केल्यास पाकिस्तान त्यांच्याविरुद्ध सूड घेईल, असे पाकिस्तानच्या सैन्याने म्हटले आहे.
इम्रान खान यांनी फेटाळले आरोप
अफगाणिस्तानात तालिबान्यांना मदत करणे आणि दहशत पसरविण्याचा पाकिस्तानवर नेहमीच आरोप होत आले आहेत. एक दिवस आधी इम्रान खान म्हणाले होते की, अफगाणिस्तानमध्ये काय घडत आहे आणि तालिबान काय करत आहेत यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरणे योग्य नाही. महत्त्वाचे म्हणजे अफगाणिस्तानात 20 वर्षांपासून युद्ध चालू आहे आणि आता परदेशी सैन्याने माघार घेतली आहे. तालिबान हा परकीय सैन्यांची माघार हा आपला विजय मानत आहे आणि तो देश ताब्यात घेत आहे.
Pakistan sends 10 thousand jihadi fighter in afghanistan says president ashraf ghani imran khan
महत्त्वाच्या बातम्या
- नवाब मलिक म्हणाले- राष्ट्रवादी आणि भाजप नदीचे दोन किनारे, दोन्ही एकत्र येणे अशक्य
- शिवसेना विधानसभा संघटक प्रमोद दळवींची ईडीकडून चौकशी, पीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवान यांच्याशी आर्थिक व्यवहारांवरून ईडीचा तपास
- EDचा अनिल देशमुखांना जबरदस्त दणका, 4 कोटी नाही, तर तब्बल 350 कोटींची मालमत्ता केली जप्त !
- लखनऊमध्ये प्रियांका गांधींसह शेकडो कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल, कलम 144चे उल्लंघन केल्याचा आरोप
- अमेरिकेने भारताला सोपवले घातक MH-60R मल्टी रोल हेलिकॉप्टर्स; अशी आहेत वैशिष्ट्ये