वृत्तसंस्था
नवी दिल्ली – भारताचे शेजारी देश एका पाठोपाठ एक दिवाळखोरीच्या खाईत लोटले जात आहेत तरी तिथले राज्यकर्ते आपापल्या रागातच मश्गुल आहेत. श्रीलंकेपाठोपाठ पाकिस्तानची अवस्था देखील दिवाळखोरच होत चालली आहे आणि त्याचवेळी तिथले पंतप्रधान शहाबाज शरीफ काश्मीर प्रश्नाचे जुने गंजलेले तुणतुणे वाजवत आहेत. Pakistan in economic pits: Petrol-diesel inflation erupts, heading towards Sri Lankav
-पाकिस्तानात महागाईने कळस गाठला आहे. पेट्रोल डिझेलच्या महागाईने सर्व विक्रम मोडून पडले आहेत. तरी वाढती महागाई, अस्थिर राजकीय वातावरण गेल्या अनेक महिन्यांपासून आपली डबघाईला आलेली अर्थव्यवस्था सांभाळत असलेल्या पाकिस्तानी राज्यकर्त्यांना यश येताना दिसत नाही.
-आंतरराष्ट्रीय फोरमवर पाकिस्तानची विश्वासार्हता आणि पत एवढी घसरलेली आहे की इंटरनॅशनल मॉनेटरी फंडाने पाकिस्तानला कोणतेही कर्ज तर सोडाच पण पतपुरवठा करणेही नाकारले आहे.
-त्यामुळे इम्रान खान सरकार जाऊन शहाबाज शरीफ यांचे सरकार आले तरी पाकिस्तानची सामान्य जनता श्रीलंकेसारखीच आर्थिक संकटाच्या गाळात अडकण्याची भीती अधिक गडद झाली आहे.
-पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचे विक्रम मोडीत
तीव्र आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारने पाकिस्तानातील सर्व पेट्रोलियम पदार्थांच्या किमती तब्बल 30.०० रुपयांनी वाढवल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. या वाढीमुळे पाकिस्तानमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर 180 रुपये, डिझेल 174 रुपये आणि रॉकेलचा दर 156 रुपये प्रति लिटर झाला आहे. अनेक पेट्रोल पंपांवरले पेट्रोल – डिझेल संपले आहे. ही महागाई कमी म्हणून की काय जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ सामान्य जनतेच्या मानगुटीवर बसली आहे.
-शहाबाज शरीफ सरकार 1 जूनपासून विजेच्या दरात प्रति युनिट 5.०० रुपयांनी वाढ करण्याच्या तयारीत आहे. वीज सबसिडी रद्द केल्यामुळे विजेच्या दरात एकूण 12.०० रुपयांनी वाढ होऊ शकते. मात्र सध्या वीजदरवाढ 5.०० रुपयांनी करण्याचे घाटत आहे. गेल्या महिन्याच्या सुरुवातीलाही पाकिस्तानमध्ये वीजदर 4.80 रुपये प्रति युनिटने वाढविले होते.
-गॅस, कोळसा आणि फर्नेस ऑइलवर चालणारे अनेक पॉवर प्लांट अलिकडच्या काही महिन्यांत पाकिस्तानमध्ये बंद झाले आहेत. जनतेला कडक उन्हाळ्यात वीज खंडित होण्याच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे.
-परकीय गंगाजळीत खडखडाट
रोख रकमेच्या चणचणीमुळे त्रस्त असलेल्या पाकिस्तानचा परकीय चलनाचा साठा या महिन्यात 10.1 अब्ज डॉलरवर घसरला आहे. एवढा कमी परकीय चलन साठा म्हणजे पेट्रोल आणि डिझेलसह जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीसाठी पाकिस्तानकडे आता फक्त २ महिन्यांपुरता पैसा शिल्लक आहे. पाकिस्तानची परकीय चलनाची गंगाजळी सातत्याने कमी होत आहे.
-6 मे रोजी संपलेल्या आठवड्यात ती 16.4 अब्ज डॉलर्स होती, हा डिसेंबर 2019 नंतरचा सर्वात कमी परकीय चलन साठा आहे. पाकिस्तानचा परकीय चलनसाठा ऑक्टोबर 2016 मध्ये सर्वाधिक 19.9 अब्ज डॉलर्स होता आणि जानेवारी 1972 मध्ये 96 मिलियन डॉलर्स इतका कमी होता. त्यामुळे पाकिस्तान आता जीवनावश्यक वस्तू कशा खरेदी करणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
Pakistan in economic pits: Petrol-diesel inflation erupts, heading towards Sri Lanka
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्र्यांवर थेट शरसंधान साधत संभाजीराजेंची राज्यसभा निवडणुकीतून माघार!!
- राज्यसभा निवडणूक : संभाजीराजांचे गणित जुळेना, माघारीची आक्रमक तयारी!!; पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष
- 2024 : कलम 144 नव्हे, भाजपसाठी मिशन 144; काटेकोर नियोजनासह मोर्चेबांधणी!!
- Gandhi – Savarkar – Jinnah : गांधी – सावरकर – जीना एकत्रित बैठकीचा प्रस्ताव कोणी दिला होता??, पण ती कोणी टाळली…??