• Download App
    पाकिस्तानने इराणच्या राजदूताची केली हकालपट्टी; तेहरानमधून आपल्या राजदूताला परत बोलावले; दोन्ही देशांत सैन्य तणाव वाढला|Pakistan expels Iranian ambassador; recalled its ambassador from Tehran; Military tension increased between the two countries

    पाकिस्तानने इराणच्या राजदूताची केली हकालपट्टी; तेहरानमधून आपल्या राजदूताला परत बोलावले; दोन्ही देशांत सैन्य तणाव वाढला

    वृत्तसंस्था

    इस्लामाबाद : मंगळवारी रात्री पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील जैश-अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या तळांवर हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि इराणमधील संबंधांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे.Pakistan expels Iranian ambassador; recalled its ambassador from Tehran; Military tension increased between the two countries

    बुधवारी पाकिस्तानने इराणच्या राजदूताला देश सोडण्याचे आदेश जारी केले. याशिवाय तेहराणमध्ये उपस्थित असलेल्या राजदूतांनाही तात्काळ परतण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, इराणचा उच्चस्तरीय मुत्सद्दी सध्या पाकिस्तानमध्ये नाही.



    इराण मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, इराणने अचानक आपल्या सीमेवर लष्कराची तैनाती वाढवली आहे. दहशतवाद्यांची ढाल बनवून पाकिस्तानचे सैन्य इराणला प्रत्युत्तर देऊ शकते, असे मानले जाते. या हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कर आणि सरकारला देशात नामुष्कीचा सामना करावा लागत आहे.

    मंगळवार आणि बुधवारी मध्यरात्री, इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC किंवा इराणी लष्कर) ने बलुचिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश अल-अदलच्या स्थानांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केला.

    त्यानंतर काही तासांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने रात्रीच एक निवेदन जारी करून तीव्र निषेध नोंदवला होता. ‘जिओ न्यूज’नुसार – या घटनेनंतर पाकिस्तानमध्ये जबरदस्त राजकीय आणि लष्करी हालचाली पाहायला मिळाल्या. रात्रभर बैठकांचे सत्र सुरू होते. लष्करप्रमुख असीम मुनीर आणि काळजीवाहू पंतप्रधान अन्वर उल हक काकर यांच्यात बैठक झाली.

    परराष्ट्र मंत्र्यांच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांनी बुधवारी दुपारी माध्यमांशी संवाद साधला. म्हणाल्या- आम्ही तेहराणमध्ये उपस्थित असलेल्या आमच्या राजदूताला तत्काळ देशात परतण्यास सांगितले आहे. इराणच्या राजदूताला देश सोडण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, सध्या इराणचे राजदूत त्यांच्या देशात आहेत. इराणने प्रक्षोभक कृत्य केले आहे. हे आम्ही कोणत्याही किंमतीत सहन करू शकत नाही.

    Pakistan expels Iranian ambassador; recalled its ambassador from Tehran; Military tension increased between the two countries

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या