Pakistan And Taliban Flags Side By Side : 16 जुलै रोजी अफगाणिस्तानातील स्पिन बोल्डक भागात भारतीय फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दिकी यांची हत्या झाली, त्या ठिकाणी तालिबान आणि पाकिस्तानचे झेंडे एकत्र फडकावलेले दिसत आहेत. तालिबानसाठी पाकिस्तानचे समर्थन चव्हाट्यावर आले आहे. अलीकडेच 10,000 पाकिस्तानी तरुणांना अफगाणिस्तानात तालिबानच्या फौजेत भरती केल्याचे आरोप अफगाण राष्ट्रपतींनी केले आहेत. त्यांच्या बळावर तालिबानला अफगाणिस्तानात दहशत पसरवायची असून भारताने उभारलेल्या पायाभूत सुविधांचा विध्वंसही घडवायचा आहे. Pakistan And Taliban Flags Side By Side In Spin Boldak In Afghanistan Where Danish Siddiqui Was Killed
वृत्तसंस्था
काबूल : 16 जुलै रोजी अफगाणिस्तानातील स्पिन बोल्डक भागात भारतीय फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दिकी यांची हत्या झाली, त्या ठिकाणी तालिबान आणि पाकिस्तानचे झेंडे एकत्र फडकावलेले दिसत आहेत. तालिबानसाठी पाकिस्तानचे समर्थन चव्हाट्यावर आले आहे. अलीकडेच 10,000 पाकिस्तानी तरुणांना अफगाणिस्तानात तालिबानच्या फौजेत भरती केल्याचे आरोप अफगाण राष्ट्रपतींनी केले आहेत. त्यांच्या बळावर तालिबानला अफगाणिस्तानात दहशत पसरवायची असून भारताने उभारलेल्या पायाभूत सुविधांचा विध्वंसही घडवायचा आहे.
वृत्तानुसार, पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने या दहशतवाद्यांना भारताने अफगाणिस्तानात उभारलेल्या पायाभूत सुविधा नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. तथापि, बर्याच वर्षांपासून अफगाणिस्तानमधील हक्कानी नेटवर्क या दहशतवादी संघटनेने भारताच्या मालमत्तेचे नुकसान केले आहे. या संघटनेला पाकिस्तानचे सहकार्य लाभले आहे.
अफगाणिस्तानात भारताची 3 अब्ज डॉलर्सहून अधिक गुंतवणूक
दोन दशकांत अफगाणिस्तानात अनेक क्षेत्रांत भारताने 3 अब्ज डॉलर्सहून अधिक गुंतवणूक केली आहे. यात अफगाणिस्तानच्या संसदेपासून ते अनेक रस्त्यांची निर्मितीही सामील आहे. अफगाणिस्तानच्या शिक्षण क्षेत्रात भारताने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. येथे शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी पायाभूत सुविधा तयार करण्यात भारताने मदत केली आहे. पाकिस्तानच्या अतिरेक्यांना भारताने केलेल्या या सर्व मदतीची साक्ष देणाऱ्या मालमत्ता नष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तालिबान्यांचे दानिशच्या मृत्यूवर नक्राश्रू
शुक्रवारी दानिश यांच्या हत्येबद्दल दु:ख व्यक्त करताना तालिबान्यांनी म्हटले की, “पत्रकार आम्हाला माहिती न देता युद्धग्रस्त भागात येत आहेत याबद्दल आम्हाला वाईट वाटते.” कोणाच्या गोळीबारात पत्रकार ठार झाला हे आम्हाला माहिती नाही. युद्धग्रस्त भागाला भेट देणाऱ्या कुठल्याही पत्रकाराने आम्हाला त्याची माहिती दिली पाहिजे. आम्ही त्याची पूर्ण काळजी घेऊ.
वार्तांकनादरम्यान हत्या
अफगाणिस्तानच्या कंधारमध्ये तीन दिवसांपूर्वी तालिबान आणि सुरक्षा दलातील चकमकीदरम्यान भारतीय छायाचित्रकार दानिश सिद्दिकी यांची हत्या झाली होती. ते रॉयटर्स या वृत्तसंस्थेसाठी काम करत होते. 2018 मध्ये त्यांना पुलित्झर पुरस्कार देण्यात आला. दानिश गेल्या अनेक दिवसांपासून स्पिन बोल्डक जिल्ह्यातील सद्य:स्थितीची माहिती देत होते. अफगाणिस्तानाच्या स्पेशल फोर्ससे बचाव मोहिमेवर असताना दानिश त्यांच्यासमवेत उपस्थित होते.
Pakistan And Taliban Flags Side By Side In Spin Boldak In Afghanistan Where Danish Siddiqui Was Killed
महत्त्वाच्या बातम्या
- पाकिस्तानमध्ये मोठी दुर्घटना : ट्रक-बसच्या धडकेत 30 ठार, 40 हून अधिक जखमी; ईदनिमित्त सर्वजण आपल्या घरी जात होते
- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सरकारने सुरू केली तयारी, जीवनरक्षक औषधांचा एक महिन्याचा स्टॉक करणे सुरू
- WATCH : नवी मुंबईत मुसळधार, खारघरच्या डोंगरात अडकलेल्या 120 जणांचे थरारक रेस्क्यू ऑपरेशन
- कांवड यात्रेवर बंदी आणि बकरीदला सूट हा मुद्दा बनत चालला आहे, सर्वोच्च न्यायालयाने केरळ सरकारला मागितले उत्तर
- Monsoon Session : संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये विरोधकांचा जोरदार गोंधळ, लोकसभा आणि राज्यसभेची कार्यवाही स्थगित