भिंतीवरील काटेरी तारा कापून एअरबेसच्या आत प्रवेश केला.
विशेष प्रतिनिधी
इस्लामबाद : पाकिस्तानच्या मियांवली एअरबेसवर दहशतवादी हल्ला झाल्याची बातमी आहे. दहशतवाद्यांनी एअरबेसमधील अनेक लढाऊ विमानांना आग लावल्याचे सांगण्यात येत आहे. Major terrorist attack on Mianwali Airbase Terrorists set fire to fighter planes
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शनिवारी सकाळी दहशतवाद्यांनी पंजाब प्रांतातील मियांवली येथील लष्कराच्या एअरबेसवर हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी काही दहशतवादी शिडी वापरून एअरबेसच्या भिंतीवर चढले. त्यानंतर त्यांनी भिंतीवरील काटेरी तारा कापून एअरबेसच्या आत प्रवेश केला.
या घटनेशी संबंधित अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर दिसत आहेत. ज्यामध्ये एअरबेसमध्ये भीषण गोळीबार आणि बॉम्बस्फोटानंतर आगीच्या ज्वाला दिसत आहेत. याशिवाय लढाऊ विमानेही जळताना दिसतात. मात्र, या व्हिडिओंची अद्याप पुष्टी झालेली नाही.
Pakistan Major terrorist attack on Mianwali Airbase Terrorists set fire to fighter planes
महत्वाच्या बातम्या
- Cricket World cup 2023 : मॅट हेन्री विश्वचषकातून बाहेर; दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात हाताला दुखापत; न्यूझीलंड संघात जेमिसनचा समावेश
- नेपाळमध्ये 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप, 128 जणांचा मृत्यू; दिल्ली-एनसीआर, एमपी-यूपीतही हादरली धरणी
- जातनिहाय जनगणना, जात आरक्षण राजकीय आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी व्होट बँक बांधणीचा भाजपचा मास्टर प्लॅन
- झिम्मा २’ चित्रपटात रिंकू राजगुरु साकारणार ‘हे’ पात्र!