विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : फ्रान्सच्या राजदूतांची हकालपट्टी करण्याची मागणी करत तेहरीके लब्बैक पाकिस्तान (टीएलपी) या बंदी असलेल्या कट्टरतावादी संघटनेने सुरु केलेल्या आंदोलनासमोर शरणागती पत्करत पाकिस्तान सरकारने आज राजदूतांच्या हकालपट्टीचा ठराव संसदेत मांडणार असल्याचे जाहीर केले.Pak government surrenders again in the face of extremism The ambush of the French ambassador is inevitable
पाकिस्तानात सध्या फ्रान्सविरोधी वातावरण असून त्यांच्या राजदूतांची हकालपट्टी करावी, ही ‘टीएलपी’ची प्रमुख मागणी होती. या मागणीसाठी हिंसक आंदोलन सुरु केल्याने त्यांच्यावर गेल्या आठवड्यात बंदी घालण्यात आली होती.
काल (ता. १९) आणि आज या संघटनेच्या नेत्यांबरोबर झालेल्या चर्चेत हकालपट्टीची मागणी मान्य करण्यात आली. या बदल्यात ‘टीएलपी’ने लाहोरसह देशभरात इतरत्र सुरु केलेले धरणे आंदोलन मागे घेण्याची तयारी दर्शविली आहे.
काल आंदोलकांविरोधात कारवाई करताना पोलिसांनी बळाचा वापर केल्याने त्यात तीन आंदोलकांचा मृत्यू झाला. यामुळे हिंसक जमावाने ११ पोलिसांना ओलिस ठेवले होते. फ्रान्सच्या राजदूतांची हकालपट्टी हा काही मार्ग नव्हे,
असे म्हणणारे पंतप्रधान इम्रान खान यांनी या घटनेनंतर ‘टीएलपी’बरोबर बोलणी करत हकालपट्टी करण्याचा ठराव मांडण्याची तयारी दर्शविली.