• Download App
    निरपराधांच्या नरसंहारामुळे संताप, रशियाला यूनोच्या मानवी हक्क समितीतून केले निलंबित|Outrage over the massacre of innocents, Russia suspended from the UN Human Rights Committee

    निरपराधांच्या नरसंहारामुळे संताप, रशियाला यूनोच्या मानवी हक्क समितीतून केले निलंबित

    विशेष प्रतिनिधी

    जिनेव्हा : निरपराधांचा नरसंहार करणाऱ्या रशियाबद्दल संपूर्ण जगात संताप व्यक्त होत आह. संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क समितीतून रशियाला निलंबित करण्याचा ठराव संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत बहुमताने संमत करण्यात आला. युक्रेनची राजधानी किव्हच्या परिसरात रशियन सैनिकांनी निरपराध नागरिकांची हत्या केल्याचा आरोप आहे. त्याची पडताळणी करून हे पाऊल उचलण्यात आले.भारत या मतदानप्रसंगी अनुपस्थित राहिला.Outrage over the massacre of innocents, Russia suspended from the UN Human Rights Committee

    अमेरिकेने मांडलेल्या या ठरावाच्या बाजूने ९३ तर विरोधात २४ देशांनी मतदान केले. ५८ देश या मतदानाला अनुपस्थित राहिले. या ठरावात म्हटले होते की, युक्रेनमध्ये मानवी हक्कांची मोठी पायमल्ली होत असून ही चिंताजनक स्थिती आहे. रशियाने युक्रेनमध्ये मानवी हक्कविषयक सर्व आंतरराष्ट्रीय कायदे पायदळी तुडविले आहेत.



    संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला उपस्थित असणाऱ्यांपैकी दोन तृतीयांश लोकांनी एखाद्या ठरावाच्या बाजूने मतदान केल्यास तो संमत झाला, असे मानले जाते. ठरावाच्या वेळी अनुपस्थित असलेल्यांची गणना मतदान प्रक्रियेत गृहीत धरली जात नाही.

    संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीचा कायमस्वरूपी सदस्य असलेल्या एखाद्या देशाला मानवी हक्क समितीतून निलंबित करण्याची ही पहिलीच घटना आहे. त् आमच्या विरोधातील ठरावाला अनेक देशांनी पाठिंबा दिला आहे किंवा जे देश मतदानाला अनुपस्थित राहतील, ते आम्हाला सहकार्य करत नसल्याचे समजण्यात येईल, असा इशारा रशियाने दिला होता.

    रशियाशी असलेले व्यापारी संबंध स्थगित करण्याचा तसेच त्या देशाकडून तेल निर्यात करण्यावर बंदी घालण्याबाबतचा ठराव अमेरिकी सिनेटने गुरुवारी एकमताने संमत केला. युक्रेनवर रशियाने केलेली कारवाई व तेथील नागरिकांवर केलेले अत्याचार यांच्या निषेधार्थ अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे.

    Outrage over the massacre of innocents, Russia suspended from the UN Human Rights Committee

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या